सांगली- भाजपाच्या आमदार गोपीचंद पडळकर यांनी आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीला प्रशासनाचा विरोध होता. पोलिसांनी मोठा पोलीस फौजफाटा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या झरे (ता. आटपाडी) या गावी तळ ठोकून तैनात केला होता. तसेच नऊ गावात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. प्रशासनाची अशी जय्यत असतना देखील अखेर गनिमीकाव्याने आमदार गोपीचंद पडळकर यांनी बैलगाडी शर्यत पार पाडली आहे. आटपाडीच्या झरे येथे पडळकर समर्थकांनी मैदानात बैलगाडी शर्यतीचे आयोजन करत विना लाठीकाठी बैलगाडी शर्यती पार पाडल्या.
यावेळी पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त आणि झरे गावाला वेढा असताना पोलिसांनी चकवा देत गावाच्या बाहेर माळरानावर गनिमी काव्याच्या नितीने बैलगाडी शर्यत पार पाडली. या स्पर्धेच्या ठिकाणी शेकडो बैलगाडी समर्थक उपस्थित होते. तसेच गनिमी कावा पद्धतीने यशस्वीरित्या ही बैलगाडी शर्यत पार पडल्याने आमदार पडळकरांच्या समर्थकांनी आणि बैलगाडा शर्यत प्रेमींनी यावेळी एकच जल्लोष केला.
पोलीस प्रशासनाला चकवा...
बैलगाडी शर्यत रोखण्यासाठी प्रशासनाने प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवला होता. गावाला संपूर्ण वेढा होता.तर 9 गावात संचारबंदीही लागू करण्यात आली होती. झरे गावात प्रवेश बंदीही करण्यात आली होती. मात्र सर्व दबाव झुगारून पडळकरांनी गावाच्या बाहेर शर्यती घेतल्या, आणि त्या यशस्वीपण केल्या. बैलगाडीच्या शर्यतीच्या 2 फेऱ्या यावेळी पार पडल्या. त्यामुळे पोलीस प्रशासनाला चकवा देऊन या शर्यती पार पडल्याने पडळकर समर्थाकांनी जोरदार जल्लोष केला.
पोलीस आणि बैलगाडी प्रेमी आमने-सामने..