सांगली येथे महामार्गामध्ये जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांचे आंदोलन - सांगली जिल्हाधिकारी
अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱयांनी आंदोलन केले. सांगली जिल्ह्यातील रत्नागिरी - नागपूर विजापूर-गुहागर दोन महामार्गांमुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित झाल्या आहेत.परंतू जमिनीचा योग्य मोबदला दिला जात नाही. त्यामुळे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषणही करण्यात आले.
शेतकऱयांनी शासनाविरोधात घोषणा देत निषेध नोंदविला
सांगली- जिल्ह्यात रत्नागिरी - नागपूर व विजापूर - गुहागर या दोन महामार्गाचे बांधकाम सुरु आहे. या महामार्गामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित झाल्या आहेत. परंतु, अधिग्रहित केलेल्या जमिनीचा योग्य मोबदला शेतकऱ्यांना दिला जात नाही. त्याच्या निषेधार्थ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.