सांगली - जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात जमिनीचा मोबदला मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी थेट कालव्मयात उतरत जलसमाधी आंदोलन सुरु केले आहे. कालव्यासाठी जमिनी घेऊन अद्याप मोबदला देण्यात सरकार टाळाटाळ करत असल्याने आटपाडीच्या पडळकरवाडी येथील शेतकऱ्यांनी हे आंदोलन केले आहे.
जमीनीचा मोबदला मिळत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन.. - agitation
सर्वच शासकीय कार्यालयांनी आम्हाला भरपूर त्रास दिला आहे. मोबदला मिळत नसल्याने निराश होत आंदोलन करण्याची वेळ आमच्यावर आल्याचे शेतकरी सांगत आहेत.
सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील पिंपरी बुद्रुक,पडळकरवाडी येथील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी टेंम्भू कालव्यासाठी शासनाकडून संपादीत करण्यात आल्या.या जमिनीच्या बदल्यात मोबदला देण्याचे शेतकऱ्यांना आश्वासन देण्यात आले होते. याबाबत संबंधित अधिराऱ्यांसोबत अनेक वेळा शेतकऱ्यांच्या बैठकाही घेण्यात आल्या होत्या. प्रत्येक बैठकीत मोबदला देण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले जात असे. मात्र, अद्याप शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला मिळाला नाही.
कालव्यासाठी शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी घेण्यात आल्या होत्या तिथे आता कालवे बांधण्यात आले आहेत. मोबदला न मिळाल्यामुळे मागील महिन्यात शेतकऱ्यांनी कालव्याचे आवर्तण रोखले होते. मात्र, दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांनी माघार घेत कालव्यात पाणी सोडण्यास परवांगी दिली होती. मात्र, भूमिअभिलेख कार्यालयातून शेतकऱ्यांना मोबदला मिळवून देण्यासाठी कोणतीच हालचाल होत नसल्यामुळे आक्रमक शेतकऱ्यांनी थेट कालव्याच्या पाण्यातच उतरत जलसमाधी आंदोलन सुरु केले आहे. सर्वच शासकीय कार्यालयांनी आम्हाला भरपूर त्रास दिला आहे. मोबदला मिळत नसल्याने निराश होत आंदोलन करण्याची वेळ आमच्यावर आल्याचे शेतकरी सांगत आहेत.