सांगली - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून जिल्ह्यात मतदार जागृती अभियान राबवण्यात येत आहे. आज सांगली महापालिकेच्या माध्यमातून मतदान जनजागृतीसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महापालिका क्षेत्रातील सुमारे सहाशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेत, मतदानाचे संदेश देणाऱया विविध चित्रकृती साकारल्या.
सांगलीत मतदार जागृती अभियानांतर्गत पार पडली चित्रकला स्पर्धा
सांगली लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
सांगली लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अभियाना अंतर्गत आज सांगली महापालिका प्रशासनाकडून मतदान जागृती बाबत चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
शहरातील आमराई उद्यानात पार पडलेल्या या स्पर्धेत सांगली शहरातील सुमारे साडे सहाशे स्पर्धकांनी सहभाग घेत, मतदान जागृतीबाबत अनेक प्रबोधनात्मक चित्रे रेखाटली. कार्टून आणि व्यंगचित्रांच्या माध्यमातून मतदान जागृतीचा संदेश यावेळी सर्वच स्पर्धकांनी दिला. जिल्हा निवडणूक शाखेच्या वतीने आयोजित या स्पर्धेमुळे अबोल झालेली आमराई बोलकी झाली.