महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sangli Flood: मुसळधार पावसामुळे नाला ओव्हरफ्लो, नागरिकांचे पाण्यात बसून आंदोलन.. - protest by sitting in water in sangli

सांगली शहरात शुक्रवारी मध्य रात्रीपासून पडणाऱ्या मुसळधार (heavy rain in sangli) पावसामुळे शहरातल्या जुने कुपवाड रोडवरील नाला ओव्हरफ्लो झाला आहे. नागरिकांनी याच पाण्यात बसून प्रशासनाच्या विरोधात आंदोलन केलं. (citizens protest by sitting in water)

Breaking News

By

Published : Oct 22, 2022, 5:52 PM IST

सांगली: सांगली शहरात शुक्रवारी मध्य रात्रीपासून पडणाऱ्या मुसळधार (heavy rain in sangli) पावसामुळे शहरातल्या जुने कुपवाड रोडवरील नाला ओव्हरफ्लो झाला आहे. यामुळे हा संपूर्ण परिसर जलमय झाला होता. परिसरातील घरांना पाण्याचा वेढा बसला होता. प्रशासनाकडून नाल्याचे प्रस्तावित काम मंजूर न झाल्याने हा फटका बसल्याचा आरोप करत संतप्त स्थानिक नगरसेवकासह नागरिकांनी देखील याच पाण्यात बसून प्रशासनाच्या विरोधात आंदोलन केलं.(citizens protest by sitting in water).

नागरिकांचे पाण्यात बसून आंदोलन

नाला ओव्हरफ्लो झाल्याने वाहतूक विस्कळीत: सांगलीतील जुना कुपवाड रोडवर पावसामुळे नैसर्गिक नाला ओव्हरफ्लो झाल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळित झाली आहे. यामुळे येथील नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले आहे. या विरोधात या भागातील नागरिकांनी आणि स्थानिक नगरसेवकांनी रोडवर वाहत्या पाण्यात बसून निषेध आंदोलन केले. तुळजाई नगर, विद्या नगर, चैत्रबन, गांधी, गजानन, नेहरू नगर, कुपवाड फाटा परिसर, समृद्धी नगर, सुंदरनगर, आरवाडे पार्क यासह अनेक भागात पाणी शिरले आहे. रस्त्याला पाण्याचा वेढा बसल्याने आता हा नाला खोलीकरण करावा, यासाठी स्थानिक नागरिक आक्रमक झाले आहेत. सांगलीतील कुपवाड फाटा परिसरात चैत्रबेन नाला आहे. या नाल्यात मालगाव पासून पाणी येते.

ABOUT THE AUTHOR

...view details