महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सांगली, कोल्हापुरातील महापुराच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका - महापुराला कोण कारणीभूत आहे

या महापुराला कोण कारणीभूत आहे ? कोणाच्या बेजबाबदारपणामुळे एवढे नुकसान झाले ? या सर्व गोष्टींची चौकशी करण्याची मागणी करण्यासंबंधीत याचिका आज (सोमवारी) सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्याची माहिती डॉ. पवार यांनी सांगली येथे दिली. महापुरानंतर देण्यात येणारा नुकसान भरपाई तुटपुंजी आहे. याचबरोबर आपत्ती निवारण यंत्रणा कुचकामी ठरल्याचा आक्षेप करण्यात आला आहे, अशी माहितीही याचिकाकर्ते पवार यांनी दिली.

सांगली येथे पत्रकार परिषदेत बोलताना सामाजिक कार्यकर्ते डॉ. अमोल पवार

By

Published : Aug 26, 2019, 11:31 PM IST

सांगली - राज्यातील सांगली आणि कोल्हापुर या जिल्ह्यामध्ये आलेल्या महापुराच्या चौकशीसाठी येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. अमोल पवार यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. डॉ. पवार यांनी अॅड. सचिन पाटील यांच्यावतीने महापूर परिस्थितीची संपूर्ण चौकशी करण्याची मागणी करण्याबाबत जनहित याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती पवार यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.

सांगली, कोल्हापूरातील महापूराच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका

या महापुराला कोण कारणीभूत आहे ? कोणाच्या बेजबाबदारपणामुळे एवढे नुकसान झाले ? या सर्व गोष्टींची चौकशी करण्याची मागणी करण्यासंबंधीत याचिका आज (सोमवारी) सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्याची माहिती डॉ. पवार यांनी येथे दिली. तसेच या याचिकेत या महापुराला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे. तर पूर परिस्थितीला आलमट्टी जबाबदार असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.

महापुरानंतर देण्यात येणारी नुकसान भरपाई तुटपुंजी आहे. याचबरोबर आपत्ती निवारण यंत्रणा कुचकामी ठरल्याचा आक्षेप करण्यात आला आहे, अशी माहितीही याचिकाकर्ते पवार यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details