महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सहाय्यक आयुक्तासह पालिकेच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला, कारवाईसाठी गेले असता घडला प्रकार - बोकड चौक मिरज

मिरजेमध्ये फळविक्रेत्यावर कारवाई करत असताना सहाय्यक आयुक्तासह पालिकेच्या कर्मचाऱ्यांवर हल्ल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत मिरज शहर पोलीस ठाण्यात सहाय्यक आयुक्तांनी तक्रार दिली आहे.

गर्दी
गर्दी

By

Published : Sep 23, 2020, 9:14 PM IST

सांगली- मिरजेत सहाय्यक आयुक्तांसह पालिकेच्या कर्मचाऱ्यांवर हल्ल्याचा प्रकार घडला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कारवाई करत असताना फळ विक्रेत्याकडून हा हल्ला झाला आहे. यामध्ये मारहाण आणि धक्काबुक्कीचा प्रयत्न झाला असून याप्रकरणी मिरज शहर पोलीस ठाण्यामध्ये संबंधित फळ विक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माहिती देताना सहाय्यक आयुक्त
सांगली जिल्ह्यामध्ये वाढत्या कोरोनाग्रस्तांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून गर्दीच्या ठिकाणी कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महापालिका क्षेत्रातही वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर भरणाऱ्या भाजी मंडईच्या ठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेऊन भाजी बाजारावर निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र, शहरामध्ये अनेक ठिकाणी रस्त्यावर भाजी विक्रीचा प्रकार सुरू आहे. या विरोधात मिरज शहरामध्ये कारवाई करण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकावर हल्ल्याचा प्रकार घडला आहे.

मिरज शहरातील बोकड चौक या ठिकाणी रस्त्यावर फळविक्री सुरू होती. त्या ठिकाणी महापालिकेचे सहाय्यक आयुक्त दत्तात्रय गायकवाड यांच्यासह अतिक्रमणाचे पथक पोहोचले होते आणि त्यांनी त्या ठिकाणी गर्दी होत असल्याने फळ विक्रेत्याला विक्रीस मज्जाव केला. त्यामधून पालिका कर्मचारी आणि त्या फळविक्रेते यांच्यामध्ये वादावादीचा प्रकार घडला. यातून फळ विक्रेत्याने आपल्याकडे असणाऱ्या लोखंडी गजाने पालिका आयुक्त दत्तात्रय गायकवाड यांच्यासह पालिकेच्या कर्मचाऱ्यांवर हल्ल्याचा प्रयत्न केला. यात पालिकेच्या कर्मचाऱ्यांना आणि सहाय्यक आयुक्तांना धक्काबुक्की करत मारहाण करण्याचा प्रयत्न फळ विक्रेत्याकडून झाला आहे. या घटनेनंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. तरी या घटनेनंतर सहाय्यक आयुक्त दत्तात्रय गायकवाड यांनी मिरज शहर पोलीस ठाण्यात धाव घेत संबंधित फळविक्रेत्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

हेही वाचा -आईचा कोरोनाने मृत्यू, स्मरणार्थ 'त्याने' उभारले कोविड रुग्णालय

ABOUT THE AUTHOR

...view details