सांगली- येथील एका लॉजवर तरुणीचा गळा आवळून खून करण्यात आला आहे. हा खून नेमका कोणत्या कारणातून झाला, हे स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र, प्रेम प्रकरणातून हा खून झाल्याचे अंदाज व्यक्त होत आहे.
लॉजवर आढळला तरूणीचा मृतदेह, प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याचा संशय - गुन्हे
येथील एका लॉजवर तरुणीचा गळा आवळून खून करण्यात आला आहे. हा खून नेमका कोणत्या कारणातून झाला, हे स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र प्रेम प्रकरणातून हा खून झाल्याचे अंदाज व्यक्त होत आहे.
सांगली शहरातील एसटी स्टँड परिसरात असणाऱ्या टुरिस्ट लॉजवर एका महिलेचा खून झाल्याचा उघडकीस आला आहे. वैशाली अर्जुन सूर्यवंशी असे, या तरुणीचे नाव आहे. आज (बुधवार) सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. लॉजमधील एका रूममध्ये ही तरुणी मृत अवस्थेत आढळून आली. यानंतर लॉज कर्मचऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी शहर पोलीस निरीक्षक अजय शिंदकर यांच्यासह पथकाने धाव घेत पंचनामा केला. तर वैशाली हिचा रुमालाने गळा आवळून खून करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे, अशी माहिती शहर पोलीस निरीक्षक शिंदकर यांनी दिली आहे. मात्र, खुनाचे कारण हे अद्याप अस्पष्ट असून, प्रेमप्रकरणातून हा खून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.