महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सांगली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस, द्राक्ष बागांना फटका - सांगली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

सांगली जिल्ह्याच्या अनेक भागात आज (शनिवार) जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. अनेक ठिकाणी गारपीट झाली आहे. या पावसाने द्राक्षबागा व बेदाणा उत्पादक शेतकऱ्याला मोठा फटका बसला आहे.

sangli district
सांगली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

By

Published : Apr 18, 2020, 8:31 PM IST

सांगली - जिल्ह्याच्या अनेक भागात आज (शनिवार) जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. अनेक ठिकाणी गारपीट झाली आहे. या पावसाने द्राक्षबागा व बेदाणा उत्पादक शेतकऱ्याला मोठा फटका बसला आहे. तर वादळी वाऱ्याने अनेक घरांचे छत उडून गेले आहेत.

सांगली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस
सांगली जिल्ह्यामध्ये गेल्या चार ते पाच दिवसांपासून वादळी वाऱ्यासह गारपीट सुरूच आहे. शनिवारीही सायंकाळच्या सुमारास सांगली शहरासह जिल्ह्यातील जत ,वाळवा ,पलूस ,शिराळा या तालुक्यात हा वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. तर अनेक ठिकाणी गारपीटसुद्धा झाली. काही ठिकाणी अर्धा तास तर काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे भिलवडीसह काही ठिकाणच्या घरांचे पत्रे उडून गेले आहेत.तर जत तालुक्यातील एकुंडी, वज्रवाड परिसरात गारपीट होऊन रावसाहेब लक्ष्मण खलाटी यांची 1 एकर द्राक्ष बाग जमीनदोस्त झाली आहे. या परिसरात अनेक द्राक्षबागांना मोठा फटका बसला आहे. तर बेदाणा उत्पादकांनासुद्धा पडणाऱ्या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details