सांगली -तौक्ते चक्रीवादळाचा फटका सांगली जिल्ह्यालाही मोठ्या प्रमाणात बसला आहे. वादळी वारा आणि पावसामुळे जिल्ह्यातील 32.60 हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले आहे.
तौक्ते चक्रीवादळामुळे सांगली जिल्ह्यातील शेतीचे नुकसान 32 हेक्टरवरील फळपिकांना फटका
या नुकसानामध्ये मोठ्या प्रमाणात फळपिकांचा समावेश आहे. प्रामुख्याने जिल्ह्यातील 15 गावांना चक्रीवादळाचा फटका बसला आहे. साधारणपणे 72 शेतकऱ्यांचं यामध्ये शेतीचे नुकसान झाले आहे, ज्यामध्ये केळी, आंबा, नारळ, कलिंगड आणि भाजीपाला या पिकांना मोठा फटका बसला आहे.
पंचनामे सुरू, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी संपर्क साधावा
नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्यात आले असून, याचा अहवाल कृषी आयुक्तांकडे सादर करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त आणखी काही शेतकऱ्यांचे नुकसान असेल तर त्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पंचनामे करून घ्यावेत, असे आवाहन सांगलीचे कृषी अधीक्षक बसवराज मास्तोळी यांनी केले आहे.
हेही वाचा -'तौक्ते'मुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात 3, 375 हेक्टर क्षेत्रावरील बागायतीचे नुकसान