महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सांगली जिल्ह्यात 3 ठिकाणी पार पडले कोरोना लसीकरणाचे ड्राय रन - corona in sangali

कोविडच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून लसीकरण मोहीम हाती घेण्यात येणार आहे. त्यादृष्टीने देशभर कोविड लसीकरणाची रंगीत तालमीचे आयोजन करण्यात येत आहे.

कोविड लसीकरणाचे ड्राय रन
कोविड लसीकरणाचे ड्राय रन

By

Published : Jan 8, 2021, 7:22 PM IST

सांगली -कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम सांगली जिल्ह्यामध्ये पार पडली आहे. जिल्ह्यामध्ये 3 ठिकाणी रंगीत तालमीचे जिल्हा आरोग्य विभागाकडून आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत हे ड्राय रन पार पडले.

मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी
कोरोना लस रंगीत तालीम पडली पार-कोविडच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून लसीकरण मोहीम हाती घेण्यात येणार आहे. त्यादृष्टीने देशभर कोविड लसीकरणाची रंगीत तालमीचे आयोजन करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यातील ड्राय रन पूर्ण झाल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यातल्या ड्राय रनला सुरुवात झालेली आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 3 ठिकाणी कोविड लसीकरण रंगीत तालमीचे आयोजन करण्यात आलं होते. जिल्ह्यातील इस्लामपूर कवलापूर आणि सांगली शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरणाची रंगीत तालीम पार पडली आहे. जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने या ड्राय रनसाठी पूर्ण नियोजन करण्यात आलं होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांच्या आरोग्य विभागाचे अधिकारी पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये ही रंगीत तालीम पार पडली आहे.लस देण्यासाठी प्रशासन सज्ज-यावेळी बोलताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी म्हणाले आरोग्य प्रशासनाकडून लसीकरणाच्या बाबतीत पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे. सरकारकडून ज्या सूचना मिळाल्या आहेत. त्या पद्धतीने प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्याची पहिल्या टप्प्यातील रंगीत तालीम झाल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यातील रंगीत तालीम पूर्ण झाली आहे. लस सुरक्षित ठेवण्यापासून देण्यापर्यंतचे सर्व नियोजन करण्यात आले आहे. कोरोना लसीकरणाबाबत प्रशासन सज्ज असल्याचा विश्वास डूडी यांनी व्यक्त केले आहे.प्रकियापूर्ण झाल्यानंतर दिली जाणार लस-कोरोना नोडल अधिकारी डॉ.संजय साळुंखे म्हणाले. कोरोना लस देण्याबाबत आरोग्य विभागाने सर्व नियोजन केले आहे. लसीकरण करताना ऑनलाइन पद्धतीने आधी नोंदणी होणार आहे. त्यानुसार संबंधित व्यक्तीचा मोबाइलवर मॅसेज जाईल. त्यानंतर त्या व्यक्तीने आरोग्य केंद्रावर येऊन नोंदणी करावी लागणार आहे. मग त्या व्यक्तीला लस देण्यात येईल. त्यानंतर त्याला अर्धा तास निरीक्षण कक्षामध्ये ठेवण्यात येणार आहे. जर एखाद्या व्यक्तीला त्रास होऊ लागला. तर त्यानंतरची घ्यायची काळजी, प्रसंगी अ‌ॅम्ब्युलन्स, अशी सर्व व्यवस्था असणार आहे. त्याचीही रंगीत तालीम पार पडली, असल्याचे साळुंखे यांनी यावेळी सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details