महाराष्ट्र

maharashtra

सांगलीत कोरोना रुग्णसंख्येत वाढ.. जिल्ह्यातील निर्बंध आणखी कडक

By

Published : Jul 13, 2021, 8:54 PM IST

सांगली जिल्ह्यातील कोरोनाची वाढती संख्येच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांना निर्बंध कडक करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अत्यावश्यक सेवेतील दुकानांना घरपोच सेवा देण्याचे नियोजन करण्याच्या सूचना पालिका प्रशासनाला करत रस्त्याच्याकडील खाद्यपदार्थ विक्री आणि आठवड्या बाजारावर बंदी घातली आहे.

Corona positive patient  Increase in Sangli
Corona positive patient Increase in Sangli

सांगली - जिल्ह्यातील कोरोनाची वाढती संख्येच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांना निर्बंध कडक करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अत्यावश्यक सेवेतील दुकानांना घरपोच सेवा देण्याचे नियोजन करण्याच्या सूचना पालिका प्रशासनाला करत रस्त्याच्याकडील खाद्यपदार्थ विक्री आणि आठवड्या बाजारावर बंदी घातली आहे. तर 19 जुलैपर्यंत जिल्ह्यात चौथ्या स्तराचे कडक निर्बंध लागू आहेत.

निर्बंध आणखी कडक -

सांगली जिल्ह्यामध्ये कोरोनाची संख्या आता पुन्हा वाढू लागलेली आहे, रोजचा आकडा हा हजारांच्या घरात पोहचत आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून निर्बंध कडक करण्यात आले आहेत. पॉझिटिव्हिटी दर हा दहा ते वीस टक्क्यांच्या आत असल्याने सध्या सांगली जिल्ह्याचा चौथ्या स्तरात समावेश आहे.19 जुलैपर्यंत चौथ्या स्तराचे निर्बंध जिल्ह्यात लागू आहेत.

घरपोच सेवेसाठी नियोजन करा -

मात्र रुग्णसंख्या वाढत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी लागू असलेले निर्बंध आणखी कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातल्या रस्त्याच्या कडेला असणारे खाद्यपदार्थ विक्रीवर बंदी घालण्यात आलेली आहे. त्याचबरोबर शहरातील रस्त्यांवर विनापरवाना विक्री व्यवसायालाही बंदी घालण्यात आली आहे. तसेच शहर आणि ग्रामीण भागात आठवड्यात आजारांवर देखील निर्बंध घालण्यात आले आहेत.
त्याचबरोबर अत्यावश्यक सेवेतील वस्तू घरपोच देण्याबाबत पालिका प्रशासनाने योग्य नियोजन करण्याच्या सूचना देखील जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी संबंधित पालिका प्रशासनाला केल्या आहेत. सध्या सकाळी 7 ते 4 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेतील दुकान व भाजी मंडई या ठिकाणी विक्रीस परवानगी आहे.

पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकाऱ्यांचे पाऊल -

सोमवारी पालकमंत्री जयंत पाटील यांच्या सोबत प्रशासनाची बैठक पार पडली होती. या बैठकीमध्ये पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्ह्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्या बाबत चिंता व्यक्त करत, गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी असणारे निर्बंध आणखी करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी करण्याबाबत पाऊल उचलले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details