सांगली - अन्न धान्य बाबतीत नागरिकांनी काळजी करू नये. पुढील तीन महिने पुरेल एवढा साठा राज्यात आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहन कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी केले आहे. सांगलीमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची प्रकृती आणि सर्व परिस्थितीबाबत योग्य खबरदारी घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
हेही वाचा...कोरोनाचा फटका : स्वगृही परतण्यासाठी मजुराचा पायी प्रवास, दोन दिवसांनी पोहोचला घरी
सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आज (गुरुवार) कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांची आढावा बैठक संपन्न झाली. सांगली जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोनाच्या परिस्थितीत घाबरून धीर सोडू नये. सरकार आणि प्रशासन नागरिकांच्या पाठीशी खंबीर उभे आहे. जनतेच्या हितासाठी कठोर निर्णय घ्यावे लागले आहेत. येणाऱ्या काही दिवसात नागरिकांना नाईलाजाने काही त्रास सहन करावा लागणार आहे. मात्र, प्रशासनाने घेतलेले निर्णय जनतेच्या हितासाठी आहेत.