महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सांगलीत काँग्रेसचे धरणे आंदोलन; इंधन दरवाढीचा नोंदवला निषेध - sangli congress agitation

केंद्र सरकारने देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. पहिल्यांदाच पेट्रोलपेक्षा डिझेलचे दर अधिक वाढले आहेत. त्यामुळे देशभरात केंद्र सरकारच्या या दरवाढीविरोधात संतप्त पडसाद उमटत आहेत. या दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसकडून देशव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली होती. त्यानुसार सांगलीत जिल्हा काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले.

congress-agitation-against-fuel-rates-in-sangali
सांगलीत काँग्रेसचे धरणे आंदोलन

By

Published : Jun 29, 2020, 6:21 PM IST

सांगली - पेट्रोल-डीझेल दरवाढीच्या निषेधार्थ आज सांगलीत काँग्रेसने धरणे आंदोलन केले. यावेळी केंद्र सरकारचा निषेध नोंदवला. तसेच भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच डिझेलची इतक्या मोठ्या प्रमाणात दरवाढ करून सरकार जनतेची लूट करत असल्याचा आरोप यावेळी काँग्रेसकडून करण्यात आला आहे.

केंद्र सरकारने देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. पहिल्यांदाच पेट्रोलपेक्षा डिझेलचे दर अधिक वाढले आहेत. त्यामुळे देशभरात केंद्र सरकारच्या या दरवाढीविरोधात संतप्त पडसाद उमटत आहेत. या दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसकडून देशव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली होती. त्यानुसार सांगलीत जिल्हा काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले. काँग्रेस आमदार विक्रमसिंह सावंत शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मनीषा रोटे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

सांगलीत काँग्रेसचे धरणे आंदोलन
देशाच्या इतिहासात डिझेलचे दर एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची ही पहिलीच वेळ आहे. डिझेलच्या दरवाढीचा परिणाम थेट सर्वसामान्य जनतेच्या जीवनावर होतो. त्यामुळे या दरवाढीमुळे सामान्य जनतेचे कंबरडे मोडणार आहे. जगात कोणत्याही देशात डिझेलची दरवाढ भारताएवढी झालेली नाही. त्यामुळे केंद्र सरकारने डिझेलची दरवाढ तातडीने मागे घ्यावी,अशी मागणी यावेळी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details