सांगली - मिरज तालुक्यात दोन ठिकाणी बाल विवाहाचे प्रकार घडले आहेत. याप्रकरणी 10 जणांच्या विरोधात मिरज पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. तर एक सुरू असलेले लग्न रोखत वराची वरात थेट पोलिस ठाण्यात पोहोचली.
दोन बालविवाह प्रकरणी 10 जणांच्यावर गुन्हे दाखल; एकाची वरात थेट पोलीस ठाण्यात... - सांगली बातमी
सांगली जिल्ह्यातील दोन ठिकाणी बालविवाहाच्या घटना समोर आल्या आहेत. मिरज तालुक्यातील बेडग आणि सुभाषनगर याठिकाणी हे बालविवाह झाले होते. कर्नाटक मधील हिजर्गी येथील 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा सुभाष नगर येथील सचिन माळी तरुणाशी लग्न झाले. शुक्रवारी सुभाष नगर येथील घरात आल्याची माहिती मिळाल्यानंतर मिरज शहर पोलिसांनी चौकशी केली. चौकशीत मुलगी अल्पवयीन असल्याची बाब समोर आली.
बालविवाह