महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जयंत पाटलांचं भाषण ऐकायला माणसंसुद्धा थांबत नाहीत - मुख्यमंत्री - islampur news

जयंत पाटलांचं भाषण ऐकायला ५ माणसंपण थांबत नाहीत, अशी राष्ट्रवादीच्या प्रदेक्षाध्यक्षांची अवस्था आहे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगलीत केली.

महाजनादेश यात्रेत बोलताना मुख्यमंत्री

By

Published : Sep 16, 2019, 9:00 PM IST

सांगली- जयंत पाटलांचे भाषण कोणी ऐकत नाही, राष्ट्रवादीच्या यात्रेत अमोल कोल्हे यांचे भाषण नंतर असते, कारण शेवटी जयंत पाटलांचे भाषण ऐकायला ५ माणसंपण थांबत नाहीत, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगलीत केली.

महाजनादेश यात्रेत बोलताना मुख्यमंत्री

मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा आज सांगली जिल्ह्यात पोहोचली होती. इस्लामपूर येथे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते या महाजनादेश यात्रेचे स्वागत झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांची सभा पार पडली. यावेळी, बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा इस्लामपूर मतदार संघाचे आमदार जयंतराव पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला. राज्यात अनेक यात्रा निघत आहेत. त्यांच्या यात्रांना गर्दीच होत नाही. तर जयंतराव पाटील यांचे भाषण कोणी ऐकत नाही, त्यांच्या पक्षाच्या यात्रेत खासदार अमोल कोल्हे यांच्या भाषणा आधी जयंत पाटील आपले भाषण उरकून घेतात. कारण लोक केवळ अमोल कोल्हेंसाठी थांबतात. जर जयंत पाटलांनी शेवटी अध्यक्षीय भाषण केले, तर यांच्या भाषणाला ५ माणसंपण थांबत नाही, अशी अवस्था जयंत पाटलांची आहे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

हेही वाचा - 'स्वाभिमानी'कडून मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर फेकल्या कडकनाथ कोंबड्या व अंडी

ABOUT THE AUTHOR

...view details