सांगली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा आज(सोमवार) सांगली जिल्ह्यात दाखल होत आहे. कासेगाव या ठिकाणी या महाजनादेश यात्रेचे स्वागत जिल्ह्यातल्या भाजप नेत्यांकडून होणार आहे. त्यानंतर महाजनादेश यात्रा सांगलीच्या ग्रामीण भागातून शहरामार्गे सायंकाळी कोल्हापूरकडे रवाना होणार आहे.
मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा आज सांगलीत - महाजनादेश यात्रा सोमवारी सांगलीत
कसेगाव या ठिकाणी या महाजनादेश यात्रेचे स्वागत जिल्ह्यातल्या भाजप नेत्यांकडून होणार आहे. त्यानंतर महाजनादेश यात्रा सांगलीच्या ग्रामीण भागातून शहरामार्गे सायंकाळी कोल्हापूरकडे रवाना होणार आहे.
महाजनादेश यात्रा
हेही वाचा - छत्रपतींनी मागण्या करायच्या नाहीत, तर आदेश द्यायचा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यात्रेच्या स्वागतासाठी भाजपकडून जिल्ह्यात जय्यत तयारी करण्यात आली आहे. मागील पाच वर्षात राज्य सरकारने केलेल्या कामांचा लेखाजोका या महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने जनतेसमोर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मांडत आहेत. या यात्रेच्या तिसऱया टप्प्याला सुरुवात झाली आहे. रविवारी ही यात्रा पुण्यात होती. आज ती सांगलीत येणार आहे.