सांगली- शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उदयनराजे भोसले यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून इस्लामपूर येथील राजे प्रतिष्ठानच्या वतीने अत्यावश्यक सेवा सोडून संपूर्ण इस्लामपूर शहर बंद ठेवण्याचे आश्वासन करण्यात आले होते. यास इस्लामपूरकरांनी प्रतिसाद देत इस्लामपूर बंद ठेवले होते.
इस्लामपूर बंद.. राजे प्रतिष्ठानच्या आवाहनाला व्यापाऱ्यांकडून प्रतिसाद - व्यापाऱ्यांकडून प्रतिसाद
इस्लामपूर येथील राजे प्रतिष्ठानच्या वतीने अत्यावश्यक सेवा सोडून संपूर्ण इस्लामपूर शहर बंद ठेवण्याचे आश्वासन करण्यात आले होते. यास इस्लामपूरकरांनी प्रतिसाद देत इस्लामपूर बंद ठेवले होते.
मागील काही दिवसांपूर्वी खासदार संजय राऊत यांनी माजी खासदार व शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज असणारे छत्रपती उदयनराजे भोसले यांना महाराजांचे वंशज असल्याचा पुरावा दाखवावा, असे वक्तव्य केले होते. याचा निषेध म्हणून आज इस्लामपूर येथील राजे प्रतिष्ठाणचे वाळवा तालुका अध्यक्ष संजय बाळकृष्ण, कठापूरकर शहर अध्यक्ष सागर कदम, शाखा अध्यक्ष अमोल जाधव, तालुका संपर्क प्रमुख विजय काठापूरकर व त्यांच्या कार्यकर्त्यांनी इस्लामपूर शहरातून दुचाकी रॅली काढून शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर एकत्र येत संजय राऊत यांनी राजेंची जाहीर माफी मागावी व इथून पुढे बोलताना विचार करून बोलावे नाहीतर आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देत संपूर्ण इस्लामपूर शहर बंद ठेवले होते.
हेही वाचा - 'हे सरकार सूड उगवणारे नाही'; मुख्यमंत्री ठाकरेंचा भाजपला टोला