सांगली - मिरजमध्ये आज चक्क कोंबड्या फुकट वाटण्यात आल्या आहेत. कोंबड्यांमुळे कोरोना विषाणूची लागणी होत नाही, हे स्पष्ट असताना नागरिकांनी चिकनकडे पाठ फिरवली. त्यामुळे एका पोल्ट्री व्यावसायिकाने चिकनबाबतचा गैरसमज दूर करण्यासाठी कोंबड्या मोफत वाटल्या आणि कोंबड्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती.
कोरोना इफेक्ट : फुकट घ्या फुकट, कोंबड्या फुकट; मिरजेत चक्क कोंबड्या वाटल्या मोफत - कोरोना अपडेट
कोंबड्यांमुळे कोरोना विषाणूची लागण होत असल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरल्या होत्या. यामुळे नागरिकांनी चिकनकडे पाठ फिरवली. यामुळे कोंबड्यांचे दर गडगडले आहेत. सध्या १० रुपयाला एक किलो कोंबडीची विक्री केली जात आहे. तसेच पोल्ट्री व्यवसाय धोक्यात आला आहे.

गडगडलेला दर आणि कोंबडी उठाव होत नसल्याने कोंबड्यांचे पालन करणे मुश्किल झाले आहे. अनेक पोल्ट्री व्यावसायिक आपल्या हजारो कोंबड्या ठार मारत आहेत. मात्र, कोंबड्यांमुळे हा रोग होत नसल्याचे सरकारी यंत्रणांनी स्पष्ट केले आहे. असे असतानाही चिकन खाण्यास नागरिक धजावत नाहीत. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांनी चिकनबाबत असणारा गैरसमज दूर करण्यासाठी कोंबड्या मोफत वाटणे सुरू केले आहे. सांगलीतील मिरजेत आज एका पोल्ट्री व्यावसायिकाने चक्क रस्त्यावर कोंबड्या फुकट वाटल्या आहेत. शहरातील मिरासाहेब दर्गा चौकात या कोंबड्या घेण्यासाठी नागरिकांची गर्दी जमल्याचे पाहायला मिळाले.