सांगली - छत्रपती शाहू महाराजांची जयंती आज मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शहरातून सामजिक न्याय विभागाकडून सामाजिक न्याय आणि समता रॅली काढण्यात आली होती.
सामाजिक न्याय आणि समता रॅली काढून सांगलीत शाहू महाराजांची जयंती साजरी
यानिमित्ताने सामजिक न्याय व समतेची शपथ घेण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गावरून निघालेल्या या रॅलीची सांगता स्टेशन चौकात झाली. या रॅलीत शासकीय अधिकारी, दलित मित्र, तसेच लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते.
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती आज सांगली मध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. यानिमित्त सामाजिक न्याय विभागाकडून शहरातून सामाजिक न्याय आणि समता रॅली काढण्यात आली. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून या रॅलीला सुरवात झाली. यात छत्रपती शाहू महाराजांच्या वेशभूषा साकारून कलाकारांनी सहभाग घेतला होता. तसेच शाहू महाराजांच्या काळात वापरण्यात येणारी गाडी या रॅलीत आकर्षण ठरली. याचबरोबर विविध शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थीही या रॅलीत सहभागी झाले होते.
यानिमित्ताने सामजिक न्याय व समतेची शपथ घेण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गावरून निघालेल्या या रॅलीची सांगता स्टेशन चौकात झाली. या रॅलीत शासकीय अधिकारी, दलित मित्र, तसेच लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते.