सांगली - एका अट्टल चोरट्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद बंद केले आहे. त्याच्याकडून घरफोडी, चोरी, दरोडे आणि मोटर सायकल चोरी, असे सहा गुन्हे उघडकीस आणले आहे. तसेच सोन्या-चांदीच्या दगिन्यांसह 2 लाख 89 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सहा गुन्हे उघडकीस -
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला आटपाडी याठिकाणी एकजण सोन्याचे दागिने विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीनुसार पथकाने दुर्गा प्रसाद हॉटेलजवळ सापळा रचून देवगण उर्फ दिव्या पवार (19) या तरुणाला ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता आटपाडी तालुक्यातील राजेवाडी, दिघांची, तळेवाडी याठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली. तसेच सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस येथील पिलीव घाटात आपल्या साथीदारांसह एसटी बस लुटण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात समोर आले. पुढील तपासात आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - यंदाच्या अर्थसंकल्पात किरकोळ व्यापाऱ्यांना उभारी देणारी योजना जाहीर करावी - व्यापारी संघटना