महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कृष्णा नदीवरील पूल धोकादायक; तीन ठिकाणी पडले भगदाड

मिरजमधील कृष्णा नदीवरील कृष्णाघाट याठिकाणी असणारा पूल सध्या धोकादायक बनला आहे. कृष्णा नदीवरील पुलाला भगदाड पडल्याचा प्रकार उघड झाला आहे. मिरज शहर आणि कोल्हापूर जिल्ह्याला जोडणारा हा पूल आहे.

By

Published : May 9, 2019, 11:28 AM IST

Updated : May 9, 2019, 3:44 PM IST

पुलाला पडलेले भगदाड

सांगली- मिरजेतील कृष्णा नदीवरील पुलाला भगदाड पडल्याचा प्रकार उघड झाला आहे. या पुलावर 3 ते 4 ठिकाणी भगदाड पडल्याने धोका निर्माण झाला आहे. मिरज शहर आणि कोल्हापूर जिल्ह्याला जोडणारा हा पूल आहे. बांधकाम विभागाने तातडीने दखल घ्यावी, अन्यथा महाडसारखी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.

पुलाला पडलेले भगदाड


मिरजमधील कृष्णा नदीवरील कृष्णाघाट याठिकाणी असणारा पूल सध्या धोकादायक बनला आहे. मिरज आणि शिरोळ तालुक्याला जोडणारा हा पूल असून या पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. सामाजिक कार्यकर्ते गणेश तोडकर व सुनील मोरे यांनी ही धोकादायक बाब समोर आणली आहे. पुलावरील रस्त्यावर 3 ठिकाणी भगदाड असल्याचे तोडकर आणि मोरे यांनी निदर्शनास आणून दिले आहे. भगदाड पडल्याने सद्यस्थितीत हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे.


या पुलाच्या सुरक्षा कठड्याच्या पाईप तुटल्या आहेत. गणेशोत्सवादरम्यान गणेश विसर्जनासाठी प्रशासन या ठिकाणी क्रेन उभे करते. हजारो गणेशभक्त याठिकाणी गणेश मूर्ती विसर्जन पाहण्यासाठी पुलावर गर्दी करतात. त्यामुळे तात्काळ या पुलाची दुरुस्ती न झाल्यास भविष्यात मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची भीती तोडकर यांनी व्यक्त केली आहे. ही बाब सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांच्या कानावर घातली असून तात्काळ या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडीट करून पुलाची दुरुस्ती करण्याची मागणीही यावेळी त्यांनी केली आहे.

Last Updated : May 9, 2019, 3:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details