सांगली -राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ भाजपा महिला मोर्चाच्यावतीने सांगलीमध्ये आंदोलन करण्यात आले आहे. राज्य सरकारच्या विरोधात यावेळी आक्रोश आंदोलन करत निदर्शने करण्यात आली.राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेमध्ये येऊन नऊ महिने झाले आहेत, आणि या नऊ महिन्यांमध्ये राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारामध्ये मोठ्याप्रमाणात वाढ झाली आहे. असा आरोप यावेळी महिलांनी केला.
महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ भाजपचे आंदोलन
राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ भाजपा महिला मोर्चाच्यावतीने सांगलीमध्ये आंदोलन करण्यात आले आहे. राज्य सरकारच्या विरोधात यावेळी आक्रोश आंदोलन करत निदर्शने करण्यात आली. राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेमध्ये येऊन नऊ महिने झाले आहेत आणि या नऊ महिन्यांमध्ये राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारामध्ये मोठ्याप्रमाणात वाढ झाली आहे. असा आरोप यावेळी महिलांनी केला.
दिवसेंदिवस राज्यात महिलांवर अत्याचार वाढत असताना सरकार अत्याचार रोखण्यातमध्ये अपयशी ठरले आहे, तसेच अत्याचारांच्या बाबतीत न्याय देणारे राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपदही सरकारने रिक्त ठेवले आहे. असा आरोप यावेळी भाजप महिला मोर्चाच्या वतीने करण्यात आला. तसेच आंध्र प्रदेश सरकारच्या धर्तीवर दिशा कायदा तातडीने लागू करावा,अशा विविध मागण्याही यावेळी करण्यात आल्या.सांगली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर सरकारविरोधात निदर्शने करत जोरदार घोषणाबाजी करून सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. तसेच राज्य सरकारने तातडीने महिला अत्याचाराच्या विरोधात कडक कायदे लागू करावेत,अन्यथा यापुढील काळात मंत्र्यांच्या गाड्या अडवू असा इशारा यावेळी भाजपा महिला मोर्चाच्या वतीने जिल्हाध्यक्ष स्वाती शिंदे यांनी दिला आहे.