महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मी भाजपाचा खासदार, माझ्या मागे ईडी लागणार नाही - संजयकाका पाटील - केंद्रीय तपास यंत्रणा

सांगलीच्या विटामध्ये त्यांच्या उपस्थितीत एक खासगी कार्यक्रम पार पडला. यावेळी आयोजित समारंभात बोलताना अनेक स्थानिक नेत्यांनी कर्ज आणि संपत्तीवरून केलेल्या भाष्यावरून संजयकाका पाटील यांनी बोलताना मी भाजपा पक्षाचा खासदार आहे, त्यामुळे माझ्या मागे ईडी लागणार नाही, विश्वास व्यक्त केला. 'ईडीवाले व्यक्त करतील आश्चर्य'

संजयकाका पाटील
संजयकाका पाटील

By

Published : Oct 24, 2021, 11:17 AM IST

Updated : Oct 24, 2021, 11:52 AM IST

सांगली - मी भाजपाचा खासदार आहे, त्यामुळे माझ्या मागे ईडी लागणार नाही, असा ठाम विश्वास भाजपा खासदार संजयकाका पाटील यांनी व्यक्त केला आहे. सांगलीच्या विटा येथे आयोजित कार्यक्रमात खासदार संजयकाका पाटील बोलत होते.

हेही वाचा -तपास यंत्रणांनी चमकोगिरी टाळत संयम बाळगणे गरजेचे - उज्ज्वल निकम

खासगी कार्यक्रमात मत व्यक्त

सांगलीच्या विटामध्ये त्यांच्या उपस्थितीत एक खासगी कार्यक्रम पार पडला. यावेळी आयोजित समारंभात बोलताना अनेक स्थानिक नेत्यांनी कर्ज आणि संपत्तीवरून केलेल्या भाष्यावरून संजयकाका पाटील यांनी बोलताना मी भाजपा पक्षाचा खासदार आहे, त्यामुळे माझ्या मागे ईडी लागणार नाही, विश्वास व्यक्त केला.

हेही वाचा -कुत्री सोडल्यासारखी तपास यंत्रणा सोडली, पृथ्वीराज चव्हाण यांची केंद्र सरकारवर टीका

'ईडीवाले व्यक्त करतील आश्चर्य'

पाटील म्हणाले, की नुकतेच माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपात असल्याने शांत झोप लागते, असे सांगितले होते आणि आपले कर्ज एवढे आहे, की ईडी जर आली तर कर्ज पाहून काय माणसे आहेत, असे म्हणत आश्चर्य व्यक्त करतील, असे मतही खासदार संजयकाका पाटील यांनी व्यक्त केले आहे.

Last Updated : Oct 24, 2021, 11:52 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details