सांगली -एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने काका-पुतण्याच्या पोटात कळ उठली आहे, अशी टीका भाजपा आमदार गोपीचंद पडळकर ( BJP MLA Gopichand Padalkar ) यांनी केली आहे. काका-पुतण्यांना गरीब मराठा समाजाचे भले होऊ द्यायचे नाही. त्यामुळेच ईडब्ल्यूसी रद्द झाले, अशी टीकाही पडळकरांनी शरद पवार आणि अजित पवारांच्यावर केली ( Gopichand Padalkar on Sharad Pawar ) आहे. ते आटपाडीच्या झरेमध्ये बोलत होते.
हेही वाचा -CM Eknath Shinde : भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर एकनाथ शिंदेंची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले....!
निर्णय उच्च न्यायालयाने रद्द - भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि अजित पवारांच्यावर निशाणा साधला आहे. आमदार पडळकर म्हणाले, मराठा समाजाला पूर्वलक्ष्यी प्रभावाने EWS चा लाभ देण्याचा ठाकरे - पवार सरकारमधील निर्णय उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. मी त्याच वेळेस सांगत होतो की कायद्यामध्ये पूर्वलक्ष्यी प्रभावाने काही देता येत नाही.
हेही वाचा -Uddhav Thackeray : 'ते पार्सल मराठी माणसाचा अपमान करत असेल तर....'; राज्यपालांच्या वादग्रस्त विधानावरुन उद्धव ठाकरे कडाडले
'म्हणून यांच्या पोटात कळ उठतेय '- आता पुन्हा एकदा सिद्ध झाले की, काका-पुतण्यांना गरीब मराठा समाजाचे भले होऊ द्यायचे नाही. त्याचप्रमाणे काका पुतण्याचे हे दुखः आहे की, मुळात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी कुठल्याही घराणेशाहीला संधी न देता एका साध्या मराठा कुटुंबातील एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची संधी दिली, म्हणून यांच्या पोटात कळा उठतायेत आणि म्हणूनच ते आता इकडे तिकडे बोंबा मारत फिरतायेत. गरीब मराठा समाजाचं भलं करण्यापेक्षा यांना आपल्याच पै पाव्हण्यांचं भलं करायचेय, हीच यांची खरी वृत्ती बाकी सगळ्या आपुलकीच्या भूलथापा असल्याची पडळकरांनी पवारांवर टीका केलेली आहे.
हेही वाचा -Koshyari controversial statement: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे पुन्हा एकदा वादग्रस्त विधान; म्हणाले मुंबईतून गुजराथी राजस्थानी गेले तर आर्थिक राजधानीची ओळख मिटेल