सांगली- केवळ जलसंपदा खात्याचे प्रेझेंटेशन आणि आपण काही तर वेगळे करत आहोत, हे दाखवण्याचे काम जलसंपदा मंत्र्यांनी सांगलीत पूरस्थिती बैठक घेऊन केला आहे, असा आरोप भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी करत त्याचा निषेध नोंदवला आहे. यासोबत त्यांनी सांगली जिल्ह्यातील पूर नियोजन बाबतीत कोणत्याही प्रकारचे नियोजन केले नसल्याचे म्हटले आहे. या दरम्यान पडकर आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यात तू-तू मै-मै झाली.
सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील पूरस्थिती नियोजन आढावा बैठक शनिवारी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या बैठकीला तिन्ही जिल्ह्यातील मंत्री, खासदार, आमदार आणि लोकप्रतिनिधी यांच्यासह वडणेर समितीचे सदस्य उपस्थित होते.
या बैठकीत राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात तू-तू-मै-मै झाली आहे. आपण विचारलेल्या प्रश्नांवर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी उत्तर न देता बैठक बरखास्त करण्याचा इशारा आपणाला दिल्याने आपण बैठकीतून बाहेर पडल्याचे भाजपचे आमदार पडळकर यांनी सांगितले. केवळ जलसंपदा खात्याचे प्रेझेंटेशन आणि सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांना आपण काही तर वेगळे करत आहोत, हे दाखवण्याचे काम जलसंपदा मंत्र्यांनी सांगलीत पूरस्थिती बैठक घेऊन केल्याचा आरोप यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी करत निषेध नोंदवला आहे.