सांगली -भाजपच्या वतीने सांगलीमध्ये वीज वितरण कार्यालयाला हल्लाबोल करत टाळे ठोका आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी वीज कनेक्शन तोडणी नोटीसांच्या निषेधार्थ राज्य सरकार आणि वीज वितरण कंपनीच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. तसेत वीज बिल माफ करण्याची मागणी करण्यात आली आहे.
वीज कार्यालयाला ठोकले टाळे-
कोरोनाच्या काळात राज्य सरकारकडून वीज बिल माफ करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र त्यानंतर राज्य सरकारने संपूर्ण वीज बिल भरावे लागणार,अशी भूमिका जाहीर केली आहे. दरम्यान राज्यातील लाखो वीज ग्राहकांचे कोट्यावधी रुपयांची वीज बिले थकीत आहेत. याबाबत वीज वितरण कंपनीने वीज बिल भरा, अन्यथा वीज कनेक्शन तोडण्यात येतील, अशा नोटिसा वीज ग्राहकांना बजावल्या आहेत. त्या विरोधात भाजपच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात आलेला आहे.
राज्य सरकारने तातडीने वीज बिल माफ करण्याची भूमिका घ्यावी-