महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चालत्या दुचाकीने घेतला पेट, आगीत दुचाकी जळून खाक... - सांगली चालती दुचाकीला आग बातमी

जुपिटर गाडी घेऊन शिवराज माळी कुपवाड मार्गे विश्रामबागकडे रेल्वे उड्डाणपुलावरून जात होते. त्यावेळी अचानक पणे त्यांच्या पायाला चटके बसू लागल्याने, त्यांनी गाडी थांबून पाहिले असता गाडीला आग लागल्याचे दिसून आले. त्यामुळे शिवराज माळी हे गाडीपासून दूर गेले आणि काही क्षणातच गाडीने पेट घेतला. आणि बघता बघता भीषण आगीत गाडी जळून खाक झाली.

bike caught fire in sangli
चालत्या दुचाकीने घेतला पेट

By

Published : May 4, 2022, 4:37 PM IST

Updated : May 4, 2022, 5:14 PM IST

सांगली - चालत्या दुचाकीने पेट घेतल्याची घटना सांगली शहरांमध्ये घडली. या घटनेत दुचाकी जळून खाक झाली आहे. विश्रामबागच्या रेल्वे उड्डाण पुलावर ही घटना घडली. या आगीचा थरार कॅमेरामध्ये कैद झाला आहे. या घटनेनंतर काही वेळातच सांगलीच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचत दुचाकीला लागलेली आग विझवली. मात्र, या आगीत दुचाकी भस्मसात झाली आहे.

चालत्या दुचाकीने घेतला पेट, आगीत दुचाकी जळून खाक
पुलावरून जाताना अचानक गाडी पेटली -जुपिटर गाडी घेऊन शिवराज माळी कुपवाड मार्गे विश्रामबागकडे रेल्वे उड्डाणपुलावरून जात होते. त्यावेळी अचानक पणे त्यांच्या पायाला चटके बसू लागल्याने, त्यांनी गाडी थांबून पाहिले असता गाडीला आग लागल्याचे दिसून आले. त्यामुळे शिवराज माळी हे गाडीपासून दूर गेले आणि काही क्षणातच गाडीने पेट घेतला. आणि बघता बघता भीषण आगीत गाडी जळून खाक झाली. मात्र या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. तर सदरची घटना कॅमेरामध्ये कैद झाली आहे. तर उन्हामुळे गरम होऊन शॉटसर्किट झाल्याने ही आग लागल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
Last Updated : May 4, 2022, 5:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details