सांगली- वाळवा तालुक्यातील ऐतवडे खुर्द येथील बाबासाहेब पाटील हे गेल्या चाळीस वर्षांपासून खासगी वैद्यकीय क्षेत्राच्या माध्यमातून रुग्णांची सेवा करत आहेत. पाटील यांचे वडील वैद्यकीय क्षेत्रामध्ये एक नामांकित डॉक्टर म्हणून काम करत होते. त्यांचाच वारसा गेली चाळीस वर्षापासून पाटील पुढे चालवत आहेत.
सध्या कोरोनाचे संकट वाढतच असताना वैद्यकीय क्षेत्रामध्ये अनेक नवनवीन प्रयोग केले जात आहे. तर पोलीस, शासकीय डॉक्टर, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका अहोरात्र झटत आहेत. बाळासाहेब पाटील हे समाजासाठी चांगले करण्याच्या उद्देशाने त्यांचे योगदान देण्याचा प्रयत्न करत आहेत.