सांगली - मराठा समाजाला ईडब्ल्यूएस आरक्षण देण्यात सरकारला उशीरा सुचलेलं शहाणपण असल्याची टीका भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी केली आहे. तसेच सरकारच्या निर्णयाचे शेलार यांनी स्वागत केले आहे. सांगलीच्या येडेमच्छिंद्र येथे ते बोलत होते.
ईडब्ल्यूएस आरक्षण उशिरा सुचलेले शहाणपण - आशिष शेलार - ashish shelar sangli news
मराठा समाजाला ईडब्ल्यूएस आरक्षण देण्यात सरकारला उशीरा सुचलेलं शहाणपण असल्याची टीका भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी केली आहे. तसेच सरकारच्या निर्णयाचे शेलार यांनी स्वागत केले आहे. सांगलीच्या येडेमच्छिंद्र येथे ते बोलत होते.
राज्य सरकारकडून मराठा समाजाला ईडब्ल्यूएस कोट्यातून आरक्षण देण्यात आले आहे. सरकारच्या या निर्णयाचे भाजपाचे माजी मंत्री व आमदार आशिष शेलार यांनी स्वागत करत खोचक टीका केली आहे. मराठा आरक्षण कायद्याला कोर्टात टिकवू न शकणाऱ्या सरकारला मराठा समाजाला आता ईडब्ल्यूएस मधून आरक्षण देण्यात आले. मात्र हे राज्य सरकारला उशिरा सुचलेलं शहाणपण आहे, असे शेलार म्हणाले.
मराठा समाजाला ईडब्ल्यूएस आरक्षण मिळावे ही आमची मागणी होती. हा निर्णय घ्यायला बराच वेळ लागला. त्यामुळे मराठा समाजातील मुलांचे नुकसान झाल्याचे शेलार म्हणाले. मात्र हा उशीर का झाला, त्याचं उत्तरही सरकारला द्यावं लागेल, असे त्यांनी म्हटले.