सांगली -दोन दिवसांपूर्वी मिरज-पंढरपूर मार्गावरील कवठेमहांकाळ तालुक्यातल्या केरेवाडी या ठिकाणी आषाढीवारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या पायी दिंडीला अपघात झाला ( Warkari Accident At Miraj Pandharpur Road ) होता. भरधाव गाडी दिंडीत घुसल्याने 17 वारकरी हे गंभीर जखमी झाले होते. या जखमी वारकऱ्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विचारपूस ( Cm Eknath Shinde Help Warkari Accident ) केली.
भरघाव जीप वारकऱ्यांच्या दिंडीत घुसल्याने 17 जण जखमी झाले होते. त्यांच्यावर मिरजमधील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. या जखमी वारकऱ्यांची मुख्यमंत्री शिंदे यांनी आज ( 7 जुलै ) विचारपूस केली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्री शिंदे यांनी जखमी वारकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी वारकऱ्यांच्या तब्येतीची विचारपूस करत कोणत्याही प्रकारचे काळजी करू नये, असा धीर मुख्यमंत्र्यांनी दिला.