सांगली- आशा गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी सांगली जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले. यावेळी मानधन वाढण्याची मागणी करण्यात आली. तसेच याबाबत अध्यादेश न काढल्यास बेमुदत संपावर जाण्याचा इशारा महिला कर्मचाऱ्यांनी यावेळी दिला.
...तर आशा वर्कर गुरुवारपासून बेमुदत संपावर जाणार - आशा वर्कर गुरुवारपासून बेमुदत संपावर
आशा गटप्रवर्तक महिला कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढीसह विविध मागण्यांबाबत सरकार पातळीवर निर्णय झाला आहे. मात्र, त्याचा अध्यादेश अद्याप काढण्यात आलेला नाही. अध्यादेश न काढल्यास आशा वर्कर गुरुवारपासून बेमुदत संपावर जाणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
आशा गटप्रवर्तक महिला कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढीसह विविध मागण्यांबाबत सरकार पातळीवर निर्णय झाला आहे. मात्र, त्याचा अध्यादेश अद्याप काढण्यात आलेला नाही. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून आशा गटप्रवर्तक महिलांच्या मागण्या सरकार दरबारी प्रलंबित आहेत. त्यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून आंदोलन सुरू केले आहे. सरकार अध्यादेश काढण्याबाबत चालढकल करत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. तसेच अध्यादेश न काढल्यास गुरुवारपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा यावेळी आशा वर्कर युनियनकडून देण्यात आला आहे.