सांगली - मराठा आरक्षणाचा निर्णयाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या नेत्यांनी मागासवर्गीय समाजाची नोकर भरतीही पुढे ढकलण्याच्या मागणी केली आहे. यावरून माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी टीका केली आहे. ही अत्यंत चुकीची मागणी असून राज्य शासनाने या मागणीला बळी पडू नये, अन्यथा सरकार विरोधात आंदोलन छेडू, असा इशारा प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे. ते सांगलीमध्ये बोलत होते.
मराठा समाजाच्या मागणीवरून नोकर भरती स्थगित केल्यास उग्र आंदोलन - प्रकाश शेंडगे - मराठा आरक्षणावर स्थगिती
मराठा समाजाच्या मागणीवरून सरकारने नोकरभरती थांबवल्यास सरकारविरोध तीव्र आंदोलन छेडण्यााचा इशारा माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.
प्रकाश शेंडगे
मराठा समाजाच्या नेत्यांची ही मागणी अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे सरकारला आमचा इशारा आहे., सरकारने मराठा समाजाच्या मागणीला बळी पडून नोकर भरती थांबवू नये, अन्यथा राज्यातील ओबीसी व मागासवर्गीय समाजाला एकत्र करून सरकार विरोधात उग्र आंदोलन छेडु, असा इशारा माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे.
Last Updated : Feb 7, 2021, 4:08 AM IST