महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिराळ्याचा इतिहास संभाजीराजेपासून प्रसिद्ध ; भाजपला घालवून पुन्हा तोच इतिहास घडवायचाय - ncp leader Jayant patil

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील शिराळा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार मानसिंगराव नाईक यांच्या प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भाषणे झाली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे

By

Published : Oct 14, 2019, 6:04 PM IST

Updated : Oct 14, 2019, 8:58 PM IST

सांगली -शिराळ्याचा इतिहास संभाजी महाराजांपासून प्रसिद्ध आहे. भाजपला महाराष्ट्रातून घालवून पुन्हा तोच इतिहास घडवायचा आहे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी केले आहे. ते शिराळा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार मानसिंगराव नाईक यांच्या प्रचारार्थ शिराळा येथे आयोजित सभेत बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांचे भाषण

कोल्हे पुढे म्हणाले, भाजपने नाशिकमधील कांद्यावर निर्यातबंदी आणली आणि पाकिस्तान मधून कांदा निर्यात केला. यासाठी आपण भाजपला निवडून दिले होते का? तर पारंपरिक पद्धतीची नागपंचमी पूर्ववत सुरू करू असे काहींनी सांगून शिराळकरांची मने दुखावली आहेत. यासाठी आता त्यांना पायउतार करून मानसिंगराव नाईक यांना निवडून द्या, असे आवाहन अमोल कोल्हे यांनी केले.

हेही वाचा - राजकारणातले 'बाप'माणूस; मुलांसाठी करतायेत जीवाचं रान

भाजप सरकारमुळेच पाच वर्षात महाराष्ट्रात आर्थिक मंदी - जयंत पाटील

देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात 16 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यामुळे इतिहासामध्ये काळा दिवस म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर लिहावा लावेल. भाजप सरकारमुळेच पाच वर्षात महाराष्ट्रात आर्थिक मंदीचे संकट आले आहे, अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. ते शिराळा विधानसभा मतदारसंघांचे उमेदवार मानसिंगराव नाईक यांच्या प्रचारार्थ शिराळा येथे घेण्यात आलेल्या प्रचार दरम्यान बोलत होते.

हेही वाचा -VIDEO...जेव्हा प्रवीण पोटे फोटो काढण्यासाठी करतात आटापिटा

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पुढे म्हणाले, पुणतांब्याच्या घटनेनंतर काही शेतकऱ्यांना कर्ज माफी झाली. मात्र, महाराष्ट्रात आर्थिक मंदीचे सावट भाजपमुळेच पसरले आहे. मुख्यमंत्र्यांनी पाच वर्षांमध्ये युवकांना नोकऱ्या देतो म्हणून सांगितले होते. पण सध्या आर्थिक मंदी मुळे बरेच कारखाने बंद पडण्याच्या मार्गावर असल्याने लाखो कामगारांना घरात बसण्याची वेळ आली आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजपला त्यांची जागा दाखून द्या, असे आवाहन त्यांनी लोकांना केले.

Last Updated : Oct 14, 2019, 8:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details