सांगली - पीक कर्जाबाबत आणि खते-बियाणे बाबतीत राज्य सरकारकडून योग्य नियोजन करण्यात आले आहे. तसेच शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करुन उद्दिष्ट पूर्ण करण्याबाबत सहकारी व खाजगी बँकांना सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र ज्या बँका पीक कर्जांचे उद्दिष्ट पूर्ण करणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. शिवाय बँकांच्या शाखा बंद करण्याबाबत रिझर्व बँकेकडे शिफारस करणार असल्याची माहिती कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी दिली. ते सोमवारी सांगलीमध्ये बोलत होते.
कोरोनाने नव्हे, महागाईने लोक मरतायेत
केंद्राच्या महागाई विरोधात बोलताना, आज देशात केंद्र सरकारच्या वतीने प्रचंड इंधन दरवाढ करण्यात आली आहे. त्याचबरोबर जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडलेले आहेत. त्यामुळे महागाईने जनता त्रस्त झालेली आहे. तर देशात आज जरी कोरोनाचे संकट असले तरी कोरोनामुळे मरण्याऐवजी महागाईमुळे लोक आता मरत आहे, अशी टीका मंत्री कदम यांनी यावेळी केली.
पीक कर्ज ने देणाऱ्या बँकांवर कडक करवाई
यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम म्हणाले, हवामान खात्याने पावसाचा अंदाज दिला होता. मात्र नंतर काही काळ पाऊस झाला नाही. आता पावसाची पुन्हा चिन्ह निर्माण झाले आहेत. त्यामुळे राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या खते-बियाणे आणि पीक कर्जाबाबत योग्य नियोजन करण्यात आलेले आहे. महाराष्ट्रात खते आणि बियाणांचा पुरेसा साठा आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत सर्व बँकांना सूचना देण्यात आल्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे बॅंकांनी आपल्या पीक कर्जाचे उद्दिष्ट पूर्ण करणे गरजेचे आहे.
ज्या बँका उद्दिष्ट पूर्ण करणार नाहीत, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईलय मग त्या सहकारी बँका असो की खाजगी. या शिवाय ज्या बँकांच्या शाखा पिक कर्ज देणार नाहीत, त्या शाखा बंद करण्याची कारवाई करत रिझर्व बँकेकडे शिफारस करण्यात येणार असल्याचेही विश्वजीत कदम यांनी यावेळी सांगितलं.
आधी सहकार समजून घ्यावा
केंद्र सरकारच्यावतीने स्थापन करण्यात आलेल्या सहकार मंत्रालयाच्या बाबत बोलताना विश्वजीत कदम म्हणाले, सहकार हा देशभर पसरला आहे. सहकारातून अनेक संस्था चालत आहेत. सहकार जोपासण्यासाठी केंद्र सरकारने हे खाते केले असेल, तर त्याचे स्वागत आहे. पण मुळात ज्यांना सहकार कळाला नाही. त्यांनी पहिला सहकार समजून घ्यावा, असा टोला मंत्री विश्वजीत कदम यांनी लगावला आहे.
ईडीचा गैरवापर ही शोकांतिका
केंद्र सरकार इडी विभागाचा वापर हे राजकीय दृष्टिकोन ठेवून करत आहे, हे शोकांतिका आहे चुकीचे आहे. खरं तर या संस्थांचा पारदर्शक काम झाले पाहिजे. दुर्दैवाने गेल्या काही दिवसांपासून कारवाई होत आहेत. त्याचा काय हेतू आहे, कळत नाही. पण कायदा आपल्या देशात सर्वश्रेष्ठ आहे. सर्व सत्य समोर येईल, असेही कदम म्हणाले.
कट कारस्थान केंद्राकडून होत आहे का?
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फोन टॅपिंग वरून केलेल्या विधानावरून बोलताना मंत्री कदम म्हणाले, 'नाना पटोले यांचा आरोप मुख्यमंत्री किंवा उप मुख्यमंत्री यांच्यावर केलेला आरोप नाही. त्यांचे ते विधान विधानसभेच्या पटलावर केले आहे. ते जग जाहीर आहेत, पण चुकीचे कट कारस्थान केंद्राकडून होत आहे? का याची चौकशी झाली पाहिजे आहे.'
हेही वाचा -महाराष्ट्र कोरोनाची राजधानी तर ठाकरे सरकार रक्त पिपासु-भ्रष्टाचारी; आशिष शेलार यांची जहरी टीका
हेही वाचा -खळबळजनक विधान अंगाशी; नाना पटोले यांच्यावर घुमजावची ओढवली नामुष्की