महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दीडशे किलोमीटर पायी प्रवास करत दुष्काळग्रस्तांची दिंडी सांगलीमार्गे मुंबईकडे रवाना.. - पाटबंधारे विभाग

दुष्काळग्रस्त साताऱ्याला पोहोचल्यावर खासदार उदयनराजे यांचीही भेट घेणार आहेत. त्याचबरोबर मुंबईपर्यंतच्या मार्गावर जाताना अनेक लोकप्रतिनिधींनाही दुष्काळग्रस्तांचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी सरकार दरबारी प्रयत्न करण्यासाठी साकडे घालण्यात येणार आहे.

दुष्काळग्रस्तांची दिंडी सांगलीमार्गे मुंबईकडे रवाना होताना.

By

Published : Jun 10, 2019, 6:09 PM IST

सांगली - पाणी मिळावे, या मागणीसाठी जत ते मंत्रालय निघालेली दुष्काळग्रस्तांची पायी दिंडी आज सांगलीत पोहोचली. दीडशे किलोमीटरचा पायी प्रवास करत सांगलीमार्गे दुष्काळग्रस्त मुंबईकडे रवाना झाले. राजकारण विरहित निघालेली दुष्काळग्रस्तांची ही दिंडी आज जवळपास दीडशे किलोमीटरचा पायी प्रवास करत सांगलीत पोहचली होती. यावेळी जिल्हाधिकाऱयांना निवेदन देत ही दिंडी मुंबईकडे रवाना झाली आहे.

दिंडीचे आयोजक यांनी सांगली येथे 'ईटीव्ही भारत'सोबत संवाद साधला.

आजपर्यंत पंढरपूर मधील पांडुरंगाच्या दरबारात पाण्यासाठी बरेच साकडे घातले. आता मंत्रालयात बसलेल्या विठुरायाच्या दरबारात आपण जात असल्याची भावना तुकाराम महाराजांनी व्यक्त केली. तालुक्यातील राजकारणामुळे आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षपणामुळे तालुक्यातल्या पाण्याचा प्रश्न रेंगाळत पडल्याचा आरोप त्यांनी केला आहे. वंचित असणाऱ्या गावांना अवघ्या दहा किलोमीटर अंतरावरून मायथळ तलावातील पाणी कॅनॉल खुदाई करून वस्पेट येथील तलावात सोडायला. त्यामुळे वंचित गावांचा पाण्याचा प्रश्न मिटू शकतो. असे असताना लोकप्रतिनिधी आणि पाटबंधारे विभाग प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे सरकारने या तालुक्यांना वंचित गावांना पाणी द्यावे. नाहीतर लोकसहभागातून दहा किलोमीटरचा कॅनॉल खुदाई करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी तुकाराम महाराजांनी यावेळी केली.

अधिवेशना दरम्यान 20 जून रोजी दुष्काळग्रस्तांची दिंडी मुंबईत दाखल होणार आहे. रोज 35 ते 40 किलोमीटरचा पायी प्रवास करून मुक्काम करत, पायी दिंडी मुंबईकडे मार्गस्थ होत आहे. दुष्काळग्रस्त साताऱ्याला पोहोचल्यावर खासदार उदयनराजे यांचीही भेट घेणार आहेत. त्याचबरोबर मुंबईपर्यंतच्या मार्गावर जाताना अनेक लोकप्रतिनिधींनाही दुष्काळग्रस्तांचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी सरकार दरबारी प्रयत्न करण्यासाठी साकडे घालण्यात येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details