महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सांगली : शेतजमिनीच्या वादातून झालेल्या खून प्रकरणातील आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

शेतजमिनीच्या वादातून झालेल्या खून प्रकरणातील आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सांगली जिल्हा सत्र न्यायालयाने ही शिक्षा ठोठावली आहे.

By

Published : Dec 23, 2020, 10:22 PM IST

accused-sentenced-to-life-imprisonment-in-murder-case-over-agricultural-land-dispute-in-sangli
सांगली : शेतजमिनीच्या वादातून झालेल्या खून प्रकरणातील आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

सांगली -कवठेमंकाळच्या ढालगाव येथे शेतजमिनीच्या वादातून झालेल्या खून प्रकरणातील आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सांगली जिल्हा सत्र न्यायालयाने ही शिक्षा ठोठावली आहे. सुखदेव घागरे असे जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे.

कुऱ्हाडीने घाव घालत झाली होती हत्या -

सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील ढालगाव येथील पुजारी वस्ती या ठिकाणी शेतजमिनीच्या वादातून श्रीमंत पुजारी या व्यक्तीचा 2 मे 2016 रोजी डोक्यात कुऱ्हाड मारून खून झाला होता. या खून प्रकरणी सुखदेव घागरे यांच्या विरोधात कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. या खटल्याची सुनावणी सांगली जिल्हा सत्र न्यायालय मध्ये पार पडली. यामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, वैद्यकीय व इतर साक्ष ग्राह्य धरून जिल्हा सत्र न्यायालयाने सुखदेव घागरे (50) यांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच पाच हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

काय होता वाद -

ढालगाव येथील श्रीमंत पुजारी आणि त्यांचे चुलते हे दोघेही कुळ कायद्याप्रमाणे पंचवीस एकर जमीन कसत होते. यातील बारा एकर जमीन ही मूळ मालकाने आरोपी सुखदेव घागरेसह इतर लोकांना विक्री केली होती. शेत जमीनीच्या या खरेदी-विक्रीवरून सुखदेव घागरे व पुजारी यांच्यामध्ये वाद सुरू होता. या प्रकरणी दोघांनी एकमेकांविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रारीदेखील दाखल केल्या होत्या. तसेच दिवाणी न्यायालय आणि प्रांत कार्यालयामध्ये केस सुरू होत्या.

अस घडला होत खून -

शेतजमिनीचा हा वाद न्यायप्रविष्ट असताना 2 मे 2016 रोजी गावातील पुजारी वस्तीवरील रोडवर श्रीमंत पुजारी हे व्यायाम करण्यासाठी गेले होते. त्यावेळी सुखदेव घागरे तेथे पोहोचले. पुजारी आणि घागरे यांच्यामध्ये वादावादी सुरू झाली. हा वाद विकोपाला गेल्यावर घागरे यांनी त्यांच्याकडे असणाऱ्या कुर्‍हाडीने पुजारी यांच्या डोक्यात जोरदार वार केला. यावेळी पुजारी हे जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा - नाणार रिफायनरीचा शिवसेनेचा विरोध मावळला? स्थानिकांचे मतपरिवर्तन झाल्याचा राजन साळवींचा दावा

ABOUT THE AUTHOR

...view details