महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sangli Family Suicide : सांगली हादरलं ! एकाच कुटुंबातील 9 जणांची आत्महत्या - म्हैसाळ 9 जणांची आत्महत्या

म्हैसाळमध्ये एकाच कुटुंबातील 9 जणांनी विष घेवून सामूहिक आत्महत्या ( 9 people commit suicide by consuming poison ) केल्याची घडली आहे. नेमके कोणत्या कारणातून ही आत्महत्या झाली, हे अद्यापही समजू शकले नाही. मिरजेच्या शासकीय रुग्णालयात मृतांचे शवविच्छेदन सुरू आहे.

Sangli Family Suicidee
Sangli Family Suicidee

By

Published : Jun 20, 2022, 3:39 PM IST

Updated : Jun 20, 2022, 10:39 PM IST

सांगली -मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील 9 जणांनी विष घेवून सामूहिक आत्महत्या ( 9 people commit suicide by consuming poison ) केल्याची घडली आहे. नेमके कोणत्या कारणातून ही आत्महत्या झाली, हे अद्यापही समजू शकले नाही. मिरजेच्या शासकीय रुग्णालयात मृतांचे शवविच्छेदन सुरू आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी 25 जणांविरोधात मिरज ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर 11 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

काय आहे घटना? :म्हैसाळ गावातील नरवाड रोड, अंबिका नगर आणि हॉटेल राजधानी कॉर्नर या दोन ठिकाणी एकाच कुटुंबातील नऊ जणांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पशु वैद्यकीय डॉक्टर माणिक यल्लप्पा वनमोरे ( 49 ) आणि त्यांचा शिक्षक भाऊ पोपट यल्लप्पा वनमोरे ( 52 ) यांच्यासह त्यांची आई, पत्नी आणि मुलांचा समावेश आहे. डॉ. माणिक यल्लप्पा वनमोरे, पत्नी रेखा माणिक वनमोरे ( 45 ), आई अनीताई यल्लप्पा वनमोरे (28), मुलगी प्रतिमा माणिक वनमोरे, मुलगा आदित्य माणिक वनमोरे ( 15 ), पुतण्या शुभम पोपट वनमोरे ( 26 ) यांनी राजधानी हॉटेल जवळ तर दुसऱ्या घरात डॉ. माणिक यांचा भाऊ पोपट यल्लप्पा वनमोरे, संगीत पोपट (48 ) वनमोरे, मुलगी अर्चना पोपट वनमोरे ( 30 ) यांचे घरात मृतदेह आढळून आले आहेत. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे.

आत्महत्या का केली ? : आर्थिक विवंचनेतून ही आत्महत्या केली गेली असावी, अशी शंका व्यक्त केली जाते आहे. मात्र अद्याप याबाबत अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. मात्र या घटनेने संपूर्ण म्हैसाळ गावासह सांगली जिल्हा हादरुन गेला आहे. पोलिसांकडून या आत्महत्येप्रकरणी अधिक तपास केला जातो आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर याबाबत अधिक खुलासा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनाही आता शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा लागून आहे.

अशी आली घटना उघडकीस :म्हैसाळ येथील नरवाड रोडजवळील अंबिका नगर चौकात असलेल्या घरात डॉ. वनमोरे यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबातील अन्य सहा सदस्यांसह आढळून आला. अंबिका नगर चौकातील घराचा दरवाजा सकाळपासून उघडला नसल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी दरवाजा ठोठावला आणि कोणीही प्रतिसाद न दिल्याने त्यांनी दरवाजा तोडला आणि घरात सहा जण मृतावस्थेत पडलेले दिसले. इतर तिघांचे मृतदेह नंतर राजधानी कॉर्नर येथील दुसऱ्या घरात आढळले. दोन परिवारातील 9 जणांच्या सामूहिक आत्महत्येमुळे संपूर्ण गाव हादरले आहे. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.

पोलीस तपास सुरु :अद्याप घटनास्थळावरून कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच जिल्ह्याचे पोलीस अधीक्षकांसह अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. स्थानिक पोलिसांनी फॉरेन्सिक टीमलाही घटनास्थळी पाचारण केले आहे. सर्व मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. यासोबतच आजूबाजूच्या लोकांचीही चौकशी केली जात आहे.

हेही वाचा -Builder Sanjay Biyani Murder Case: बियाणी यांच्या संपत्तीवरून वाद; एका महिलेचा आक्षेप

Last Updated : Jun 20, 2022, 10:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details