महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाचा कहर वाढतोय.. सांगलीत ६१ नव्या रुग्णांची भर, एकाचा मृत्यू

शुक्रवारी दिवसभरात आणखी ६१ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये सांगली महापालिका क्षेत्रातील तब्बल ३४ जणांचा समावेश आहे. ज्यामध्ये सांगली शहरातील २३ आणि मिरज शहरातील ११ जणांचा समावेश आहे. तसेच उपचार घेणाऱ्या एक कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

sangali corona
सांगली जिल्हा

By

Published : Jul 18, 2020, 8:10 AM IST


सांगली- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे. शुक्रवारी कोरोनामुळे आणखी एकाचा बळी गेला. तर दिवसभरात ६१ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. ज्यामध्ये सांगली महापालिका क्षेत्रातील ३४ जणांचा समावेश आहे, तर उपचार घेणारे १३ जण कोरोना मुक्त झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्ण संख्या ४४३ इतकी आहे. आतापर्यंक जिल्ह्यात एकूण ९०२ कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर एकूण मृतांचा आकडा २६ झाला असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली.

सांगली जिल्ह्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहेत. तर शुक्रवारी दिवसभरात आणखी ६१ नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये सांगली महापालिका क्षेत्रातील तब्बल ३४ जणांचा समावेश आहे. ज्यामध्ये सांगली शहरातील २३ आणि मिरज शहरातील ११ जणांचा समावेश आहे. तसेच उपचार घेणाऱ्या एक कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये वाळवा तालुक्यातील कमेरी येथील ५९ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.त्यामुळे सांगली जिल्ह्यातील कोरोना मृतांचा आकडा २६ झाला आहे.

जिल्ह्यातील शुक्रवारचे कोरोना रुग्ण

आटपाडी तालुका - निंबवडे १, पलसखेड १, दिघंची १ , जत तालुका - जत शहर ५ , उमदी २ , को.बोबलाद १, गुलगुजनाळ १ , शिराळा तालुका - गवळेवाडी १, कडेगाव तालुका - मोहिते वडगाव १, मिरज तालुका - कवलापूर २, बिसुर १, गुंडेवाडी १, अंकली १ , मालगाव १, पलूस तालुका - बांववडे १, वाळवा तालुका - पेठ १ , साखरळे १, कमेरी २, आष्टा १, तासगाव तालुका - तासगाव शहर १ आणि महापालिका क्षेत्रातील ३४ असे ६१ जण कोरोना बाधित झाले आहेत.

शुक्रवारी दिवसभरात उपचार घेणारे १३ जण हे कोरोना मुक्त झाले आहेत. त्यांना डिस्चार्ज देऊन इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन मध्ये पाठवण्यात आले आहे. तसेच कोरोना उपचार घेणारे २४ रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत असून त्यांची प्रकृति चिंताजनक आहे .असून यापैकी १४ जण हे अक्सिजनवर असून १० जण हे नॉन इन्व्हेजिव व्हेंटिलेटरवर आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details