महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सांगलीत ६ जणांची माघार, १२ उमेदवार लोकसभा निवडणूक रिंगणात - candidate

सांगली लोकसभा निवडणुकीसाठी आता १२ उमेदवारांमध्ये निवडणूक होणार आहे. सांगली लोकसभा मतदार संघासाठी सुमारे २० जणांनी अर्ज भरले होते. एकूण ८ अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले

सांगलीत ६ जणांची माघार

By

Published : Apr 9, 2019, 2:37 PM IST

सांगली - लोकसभा मतदारसंघातील चित्र आता स्पष्ट झाले आहे. सध्या १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. २० पैकी ६ अपक्ष उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे भाजप, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये लोकसभेचा सामना रंगणार आहे.

सांगलीत ६ जणांची माघार


सांगली लोकसभा निवडणुकीसाठी आता १२ उमेदवारांमध्ये निवडणूक होणार आहे. सांगली लोकसभा मतदार संघासाठी सुमारे २० जणांनी अर्ज भरले होते. एकूण ८ अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. यामुळे सांगली लोकसभेचा सामना हा आता १२ जणांमध्ये रंगणार आहे. यामध्ये सहा नोंदणीकृत पक्षाचे तर ६ अपक्ष उमेदवार आहेत.
यामध्ये भाजपकडून संजयकाका पाटील, काँग्रेस महाआघाडीच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विशाल पाटील, वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर, शंकर माने बसप, आनंद पाटील- बळीराजा पार्टी, राजेंद्र कवठेकर- बहुजन मुक्ती पार्टी हे नोंदणीकृत पक्षाचे ६ आणि अभिजित बिचुकले, दत्तात्रय पाटील, अधिक चन्ने, भक्तराज ठिगळे, नारायण मुळीक, हिंमतराव कोळी असे ६ अपक्ष आता निवडणूक रिंगणात आहेत.


या सर्व उमेदवारांना निवडणूक आयोगाकडून चिन्हांचे वाटप करण्यात आले आहे. सांगली मतदारसंघाच्या निवडणूक मैदानात जरी १२ उमेदवार असले तरी खरी लढत ही भाजप, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात होणार आहे. विद्यमान भाजप खासदार संजय पाटील विरुद्ध स्वाभिमानीचे उमेदवार व वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील आणि धनगर आरक्षण लढ्याचे नेते व वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर अशी तिरंगी लढत होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details