महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Physical Abused on Minor Accused : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी नराधमास 20 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा - सांगली जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय - अल्पवयीन मुलीवर अत्याचार आरोपीला शिक्षा सांगली

एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार ( Physical Abused on Minor ) करणाऱ्या आरोपीला 20 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. ( Punishement to Accused who did Physical Abused on Minor Sangli ) किशोर सपकाळ असे या नराधमाचे नाव आहे.

Physical Abused on Minor Accused
सांगली जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय

By

Published : Feb 25, 2022, 8:48 PM IST

सांगली - एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार ( Physical Abused on Minor ) करणाऱ्या आरोपीला 20 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. ( Punishement to Accused who did Physical Abused on Minor Sangli ) किशोर सपकाळ असे या नराधमाचे नाव आहे. जत तालुक्यातील एका गावात ही घटना घडली होती. सांगली जिल्हा सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावली.

घरा शेजारच्या मुलीवर केला अत्याचार -

जत तालुक्यातील एका गावात 2019मध्ये एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी जत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता. किशोर संपकाळ या 20 वर्षीय तरुणाने त्याच्या घराशेजारी राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला खेळायला घेऊन जातो, असे सांगून नेले. या नंतर त्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला होता. तसेच अल्पवयीन मुलीला पाच रुपये देऊन कोणालाही हा प्रकार सांगू नको, असे सांगत घरी पाठवले होते.

हेही वाचा -Mahesh Manjrekar Case : महेश मांजरेकरांना अटकेपासून दिलासा देण्यास न्यायालयाचा नकार

नराधमास 20 वर्षांची शिक्षा -

घरी गेल्यानंतर पीडित अल्पवयीन मुलीने आईला सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर पीडित मुलीच्या नातेवाईकांनी जत पोलीस ठाण्यांमध्ये धाव घेऊन किशोर संपकाळ याच्या विरोधात फिर्याद दाखल केली होती. त्यानंतर सपकाळ यांच्याविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. या खटल्याची सुनावणी सांगली जिल्हा सत्र न्यायालयात पार पडली. यामध्ये किशोर सपकाळ यांच्याविरोधात सबळ पुरावे आणि पीडित मुलगी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्षनुसार जिल्हा सत्र न्यायालयाने किशोर सहकाऱ्याला दोषी ठरवत त्यास वीस वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details