महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लग्न ठरले मात्र तारीख निश्चित होत नसल्याने २० वर्षीय तरुणीची आत्महत्या - sangli suicide news

वाळवा तालुक्यातील चिकुर्डे येथे ही घटना घडली असून वैशाली शिवराम पाटील असे मृत तरुणीचे नाव आहे.

police station
police station

By

Published : May 9, 2020, 11:22 AM IST

सांगली- लग्न ठरूनही तारीख निश्चित होत नसल्याने चिकुर्डे येथील 20 वर्षीय तरुणी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वाळवा तालुक्यातील चिकुर्डे येथे ही घटना घडली असून वैशाली शिवराम पाटील आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.

या घटनेची नोंद कुरळप पोलीस ठाण्यात झाली आहे. सांगली, वाळवा तालुक्यातील चिकुर्डे येथील टाकळी वसाहतमधील वैशाली शिवराम पाटील हिचे एक वर्षांपूर्वी लग्न ठरले होते. पण, तारीख निश्चित होत नसल्याच्या नैराश्येतून शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान राहत्या घरी कोणी नसल्याचे पाहून घरातील लोखंडी तुळईला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

याची माहिती कुरळप पोलिसांना मिळताच घटनास्थळी पंचनामा करून कुरळप प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. सदर घटनेची तक्रार चुलत भाऊ दीपक कोंडीबा पाटील.याने कुरळप पोलिसात दिली असून पुढील तपास पोलीस राजेंद्र जाधव करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details