महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रंगभूमी सांगलीत 17 व्या राज्य बालनाट्य स्पर्धांना सुरुवात

17 व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धांना सुरुवात झाली. सांगली केंद्रावरही जिल्ह्यातील १८ हुन अधिक संघांनी सहभाग घेतला आहे.

18th-state-childrens-drama-tournament-began-in-sangli
रंगभूमी सांगलीत 17 व्या राज्य बालनाट्य स्पर्धांना सुरुवात

By

Published : Jan 11, 2020, 5:30 PM IST

सांगली -17 व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धांना सुरुवात झाली आहे. सांगली केंद्रावरही जिल्ह्यातील नाट्य स्पर्धांना प्रारंभ झाला आहे. तीन दिवस पार पडणाऱ्या या स्पर्धेत जिल्ह्यातील १८ हुन अधिक संघांनी सहभाग घेतला आहे. यामुळे पुढील 3 दिवस सांगलीकरांना बालनाट्याची मेजवानी मिळणार आहे.

रंगभूमी सांगलीत 17 व्या राज्य बालनाट्य स्पर्धांना सुरुवात

सांस्कृतिक कार्य संचालनालया तर्फे 17 व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धांना प्रारंभ झाला आहे. नाट्य पंढरी सांगलीमध्येही आज पासून सांगली केंद्रांची प्राथमिक फेरी स्पर्धांना सुरवात झाली आहे. शहरातील विष्णुदास भावे नाट्यगृहात या स्पर्धा पार पडणार आहेत. जिल्ह्यातील विविध शाळांचे 18 हुन अधिक संघ यामध्ये सहभागी झाले आहेत. तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धांमुळे बालनाट्याची मेजवानी सांगलीकर रसिकांना मिळणार आहे. आज पहिल्या दिवशी वेलणकर प्राथमिक विद्यालयाचा 'अशांती' व सिटी इंग्लिश मीडियम स्कुलचे 'माईंड गेम' या बालनाट्याने स्पर्धांना सुरवात झाली. मोबाईल आणि त्यातील गेम यामुळे मुलांच्यावर होणारे दुष्परिणाम यावर आधारित 'माईंड गेम' या सादर झालेल्या नाटकाने चांगलीच दाद मिळवली. पुढील तीन दिवस याठिकाणी विविध विषयांवर बाल कलाकारांची नाटके सादर होणार असून या मधून राज्य नाट्य स्पर्धांच्या अंतिम फेरीसाठी निवड होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details