महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

खाकीतील माणुसकी; सांगली पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी दिली पाच लाखांची मदत..

'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' महाराष्ट्र पोलीस दलाच्या या ब्रीदवाक्याचा अर्थ सांगलीच्या पूरपरस्थितीमध्ये पावलो-पावली दिसून आला. पूर परिस्थितीमध्ये सर्व पातळ्यांवर सांगली पोलीस दलाने जीवाची बाजी लावून कर्तव्य बजावले. सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी 5 लाखांची आर्थिक मदत महाराष्ट्र पोलीस दलाच्या 108 पीएसआय बॅचच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

खाकीतील माणुसकी; सांगली पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी दिली पाच लाखांची मदत

By

Published : Aug 27, 2019, 9:06 PM IST

सांगली - पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्यभरातून अनेक हात आज सरसावत आहेत. महाराष्ट्र पोलिसदलही पूरग्रस्तांच्या मदतीला धावले आहे. सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी 5 लाखांची आर्थिक मदत महाराष्ट्र पोलीस दलाच्या 108 पीएसआय बॅचच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

खाकीतील माणुसकी; सांगली पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी दिली पाच लाखांची मदत
'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' महाराष्ट्र पोलीस दलाच्या या ब्रीदवाक्याचा अर्थ सांगलीच्या पूरपरस्थितीमध्ये पावलो-पावली दिसून आला. पूर परिस्थितीमध्ये सर्व पातळ्यांवर सांगली पोलीस दलाने जीवाची बाजी लावून कर्तव्य बजावले. आता यापुढेही जाऊन पोलिसांनी माणुसकीच्या भावनेतून पूरग्रस्तांना आर्थिक मदतीचा हात दिला आहे.सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रोहित चौधरी सांगलीच्या पूरपरिस्थितीमध्ये सांगलीकरांच्या मदतीला धावले होते. पूर ओसरल्यानंतर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीची जाणीव झाल्याने चौधरी यांनी आपल्या 108 बॅचच्या अधिकाऱ्यांना पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदत करण्याचे आवाहन केले. याला प्रतिसाद देत राज्यातील पाचशे पोलीस उपनिरीक्षकांनी एकत्र येऊन पाच लाखांचा निधी जमा केला. हा निधी सांगली जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी यांच्याकडे जमा केला आहे. सांगली शहराचे पोलीस उपअधीक्षक अशोक विरकर यांच्या हस्ते यावेळी पूरग्रस्त भागातील शाळांना प्रत्येकी दहा हजार रुपये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजेसाठी देण्यात आले. पोलिसांवर नेहमीच अनेक पातळ्यांवर टीका होत असते. मात्र, महापुरात सांगलीच्या पोलीस दलाने बजावलेले कर्तव्य आणि त्यानंतर पूरग्रस्तांसाठी दिलेला हा मदतीचा हात खाकीतल्या माणुसकीचे दर्शन घडवणारे आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details