रत्नागिरी- लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवा वगळता बाकी सर्व बंद आहे. जिल्ह्याच्या सीमाही बंद झाल्या आहेत. त्यामुळे मुंबईतून गावी येण्यासाठी समुद्री मार्गानंतर आता चक्क कोकण रेल्वे मार्गाचा वापर करत काही जणांनी गिरगाव तर काही जण दिव्यावरून चालत खेड पर्यंत पायी प्रवास केला. 25 चाकरमानी सहा दिवसानंतर खेडमध्ये आले, मात्र खेड जवळील खवटी रेल्वे स्टेशनजवळ हे चाकरमानी जेवण बनवत असताना पोलिसांनी त्यांना हटकले असता सर्व प्रकार उघड झाला. दरम्यान, सध्या या सर्वांची राहण्याची तसेच जेवणाची व्यवस्था खेड नगर परिषद तसेच तहसील कार्यालयाकडून करण्यात आली आहे.
... म्हणून 'ते' रेल्वे रुळावरून पायी प्रवास करत आले खेडपर्यंत... - workers waliking on railway track
खेड जवळील खवटी रेल्वे स्टेशनजवळ चाकरमानी जेवण बनवत असता पोलिसांनी त्यांना हटकले असता सर्व प्रकार उघड झाला. सध्या त्यांना तेथेच थांबविण्यात आले असून त्यांची राहण्याची तसेच जेवणाची व्यवस्था खेड नगपालिकेतर्फे तसेच तहसील कार्यालयामार्फत करण्यात आली आहे.
लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवा वगळता वाहतूक सेवा पूर्णतः बंद आहे. जिल्ह्याच्या सीमा बंद झाल्या आहेत. ठिकठिकाणी पोलीस अडवत आहेत. त्यामुळे गावी जायचे म्हटले तरी शक्य होत नाही. त्यामुळे मुंबईत पोटापाण्यासाठी गेलेल्या अनेकांची सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी स्थिती आहे. हातावर पोट असलेल्या अनेकांजवळचे पैसे संपले, धान्य संपले आहे. त्यामुळे करायचे, काय असा प्रश्न अनेकांसमोर आहे.
गावी यायचे म्हटले तर रेल्वे ,बस व अन्य प्रवासी वाहतूक बंद. त्यामुळे मुंबईतल्या काही चाकरमान्यांनी कोकणात आपल्या गावी जाण्यासाठी थेट रेल्वे रूळावरून पायी चालत जाण्याचा धाडसी निर्णय घेतला. काही जण गिरगाव तर काहीजण दिव्यावरून रेल्वे मार्गावरून चालत निघाले. यातले कोणी खेड, कोणी, संगमेश्वर कोणी रत्नागिरी अशा वेगवेगळ्या ठिकाणी जाणारे होते. यात अनेक तरूण, काही महिला, पुरुष असा सव्वीस जणांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या लोकांनी जेवण तयार करण्याचे सर्व साहित्य सोबत घेतले होते. गेले पाच ते सहा दिवस मजल-दरमजल करत ते खेडमध्ये पोहोचले.