रत्नागिरी - येत्या काही दिवसांत रत्नागिरी जिल्हा कोरोनामुक्त जिल्हा होईल, आशा प्रकारचे सध्या वातावरण असल्याचे मत रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब व्यक्त केले. आज पालकमंत्री परब यांच्या अध्यक्षतेखाली कोरोनाबाबत जिल्ह्याची आढावा बैठक झाली, त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
येत्या काही दिवसात रत्नागिरी जिल्हा कोरोनामुक्त होईल - पालकमंत्री अनिल परब - corona news in ratmagiri
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशात लॉकडाऊन आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी प्रशासन, आरोग्य कर्माचरी शर्थीचे पर्यत्न करत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात रत्नागिरी जिल्हा कोरोनामुक्त होईल असा विश्वास पालकमंत्री अनिल परब यांनी व्यक्त केला.
रत्नागिरीत आता जे कोरोनाचे रुग्ण आहेत, त्यांची उपचारानंतरची पहिली टेस्ट निगेटिव्ह आली आहे. दुसरी टेस्टही निगेटिव्ह येईल, त्यामुळे येत्या काही दिवसांत रत्नागिरी जिल्हा कोरोना मुक्त होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, आढावा बैठकीला उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, आमदार राजन साळवी, आमदार भास्कर जाधव, आमदार हुस्नबानू खलिफे, जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने आदी उपस्थित होते.
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. मात्र, या लॉकडाऊनमध्ये जिल्ह्यात २० एप्रिलनंतर काही प्रमाणात शिथिलता मिळणार असल्याचे संकेत पालकमंत्री अनिल परब यांनी दिले. शिथिलता आणताना सोशल डिस्टन्सिंग यासह कठोर नियमावली अंमलात आणली जाणार आहे. जिल्ह्यात उद्योगधंदे काही प्रमाणात सुरु होणार आहेत. मात्र, कामगारांना आणण्याची-नेण्याची व्यवस्था कंपनीने स्वतः करायची आहे. 40 टक्क्यापासून आपला उद्योगधंदा सुरू करायचा आहे. त्यानंतर हळूहळू तो वाढवायचा आहे. तसेच रस्त्यांची कामे, पुलांची कामे, इमारत कामे, बांधकाम, ही कामे सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे. मात्र ही कामे करताना त्यांनी सुद्धा नियमांचे पालन करणं आवश्यक आहे. यासाठी लागणारे मजुर त्या परिसरातील असले पाहिजेत. जर जिल्ह्यातीलच नगरपालिका, तालुका हद्द ओलांडून कामगार आणायचे असतील तर त्यांना तशा परवानग्या घ्यावा लागतील. तसेच मच्छीमारांचाही प्रश्न आम्ही सोडवू, आंब्याचा प्रश्न देखील सुटला असलेल्याची माहिती अनिल परब यांनी यावेळी दिली.