महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पाणीसंकट : रत्नागिरी शहराच्या पाणी पुरवठ्यात ५० टक्क्यांनी कपात, एका दिवसाआड पुरवठा

शीळ धरणातून साळवी स्टॉप जलशुध्दीकरण प्रकल्पापर्यंत येणाऱ्या पाईपलाईनला ठिकठिकाणी गळती लागल्याने रत्नागिरी शहरात पाण्याची भीषण टंचाई सुरू आहे. त्यामुळे नगर परिषदेने शहराला एकदिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. याची अंमलबजावणी आज बुधवारपासून करण्यात येणार आहे. महत्वाचे म्हणजे दिवसाआड करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्यात ४० ते ५० टक्क्याने कपात करण्यात आली आहे.

पाणीसंकट : रत्नागिरी शहराच्या पाणी पुरवठ्यात ५० टक्क्यांनी कपात, एका दिवसाआड पुरवठा

By

Published : Jun 12, 2019, 3:12 PM IST

रत्नागिरी- लांबलेला मान्सून त्यात शीळ धरणातून साळवी स्टॉप जलशुध्दीकरण प्रकल्पापर्यंत येणाऱ्या पाईपलाईनला ठिकठिकाणी गळती लागल्याने रत्नागिरी शहरात पाण्याची भीषण टंचाई सुरू आहे. त्यामुळे नगर परिषदेने शहराला एकदिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. याची अंमलबजावणी आज बुधवारपासून करण्यात येणार आहे. महत्वाचे म्हणजे दिवसाआड करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्यात ४० ते ५० टक्क्याने कपात करण्यात आली आहे.

पाणीसंकट : रत्नागिरी शहराच्या पाणी पुरवठ्यात ५० टक्क्यांनी कपात, एका दिवसाआड पुरवठा


एक दिवासाआड पाणी पुरवठा करण्यासाठी शहराचे 2 भाग करण्यात आले आहे. साळवी स्टॉप ते माळनाका आणि माळनाका ते खालचा भाग असे दोन भाग करण्यात आले आहेत. रत्नागिरी शहरातील पाण्याची परिस्थिती बिकट झाली आहे. शीळ धरणात मुबलक पाणी असूनही केवळ नादूरूस्त पाईपलाईनमुळे शहरात पाण्याची भीषण टंचाई सुरू आहे. शीळ धरणातुन साळवी स्टॉप जलशुध्दीकरण प्रकल्पापर्यंत येणा-या पाईपलाईनला ठिकठिकाणी गळती झालेली आहे. मुख्य जलवाहिनी ६० ते ७० टक्के नादुरूस्त असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. गंभीर बाब म्हणजे एक दिवसआड ही मुख्य जलवाहिनी नादुरूस्त होते.


त्यामुळे शहराला एक दिवस आड पाणी पुरवठा सुरू करण्याचा निर्णय सत्ताधारी शिवसेना, भाजप नगरसेवकांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. दरम्यान, एमआयडीसीने शहराला एक दिवसाआड पाणी पुरवठा करताना पुरवण्यात येणा-या पाण्यातही ४० ते ४५ टक्के कपात केली आहे. एमआयडीसीने केलेली पाणी कपात आणि शीळ धरणातुन येणा-या मुख्य जलवाहीनीला असलेल्या गळत्या यामुळे एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details