महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रत्नागिरीत रात्रीपासून मुसळधार पाऊस; सरासरी 51.22 मिमीची नोंद - रत्नागिरीत जोरदार पाऊस

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याच्या सर्वच भागात जोरदार पाऊस बरसत आहे. आज सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. गेल्या 24 तासांत सरासरी 51.22 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

रत्नागिरी
रत्नागिरी

By

Published : Jun 17, 2020, 2:35 PM IST

रत्नागिरी -जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याच्या सर्वच भागात जोरदार पाऊसबरसत आहे. आज सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. गेल्या 24 तासांत सरासरी 51.22 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

पाऊस चांगल्या पडल्यामुळे शेतीच्या कामांनाही वेग आला आहे. गेल्या 24 तासांत सर्वाधिक पाऊस संगमेश्वर तालुक्यात झाला असून, संगमेश्वरमध्ये तब्बल 147 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्याखालोखाल राजापूरमध्ये 82 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर चिपळूणमध्ये 63 मिमी, तर गुहागरमध्ये 52 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर इतर तालुक्यांमध्ये 40 मिमीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details