महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वायू वादळ पुढे सरकलं, मात्र समुद्र किनारपट्टीवर अजस्त्र लाटांचं तांडव सुरू

वायू चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून पुढे सरकले आहे. मात्र, या वादळाचे परिणाम आता किनारपट्टी भागात दिसू लागले आहेत.

वायू चक्रीवादळ

By

Published : Jun 13, 2019, 5:58 PM IST

रत्नागिरी- वायू चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून पुढे सरकले आहे. मात्र, या वादळाचे परिणाम आता किनारपट्टी भागात दिसू लागले आहेत. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्याने समुद्र प्रचंड खवळला आहे. किनाऱ्याला सध्या साडेचार मीटरपर्यंतच्या लाटा उसळताना पहायला मिळत आहेत.

भगवती जेट्टीवरून वादळाच्या परिस्थितीचा आढावा घेताना ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी राकेश गुडेकर

रत्नागिरीतील भगवती जेट्टीवरूनही समुद्राच्या लाटा पाहायला मिळत आहेत. भगवती जेट्टीप्रमाणेच जिल्ह्याच्या इतर किनारपट्टी भागातही अशीच स्थिती आहे. तसेच कोकण किनारपट्टी भागात वाऱ्याचा वेगही वाढलेला पाहायला मिळत आहे. वाऱ्याच्या वेगामुळे कोकण किनारपट्टी भागात उसळणाऱ्या लाटांचे पाणी भरती बरोबर मानवी वस्तीत घुसत असल्याच्या घटना देखील काही ठिकाणी घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या पार्श्वभूमीवर पर्यटकांना देखील समुद्रावर जाण्यास प्रशासनाने बंदी घातली आहे. मासेमारीसाठी कोणीही समुद्रात जाऊ नसे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. तसेच किनारपट्टी भागात जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details