चिपळूण (रत्नागिरी)- जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात सतत पडणाऱ्या पावसामुळे नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. जिल्हात चिपळूण, गुहागर या दोन तालुक्यामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. तर दापोली, खेड, मंडणगड या ठिकाणी पावसाची रिपरिप सुरू आहे. चिपळूणमध्ये वाशिष्टी नदीची पातळी वाढल्याने बाजार पुलाला पाणी लागले आहे. त्यामुळे नदी पात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. अजूनही या भागात पावसाची संततधार चालू आहे.
बरसणाऱ्या पावसाचा जोर असल्याने वाशिष्ठी, शिव नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. बाजारपुलाला पाणी टेकायला आले आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना, व्यापाऱ्यांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.